(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Neeta Ambani Mobile : निता अंबानी कोणता मोबाईल वापरतात माहितीये का? किंमत पण जाणून घ्या!
नीता अंबानीच्या प्रत्येक वस्तुंची फार चर्चा होत असते. त्यात या वस्तुच्या किंमतीचीदेखील फार चर्चा रंगते आता नीता अंबानी यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये निता अंबानी यांच्या हातात फोन दिसत आहे.
Neeta Ambani Mobile : राम मंदिर (Ram temple) अभिषेकाच्या निमित्ताने अनेक VVIP व्यक्ती अयोध्येत दाखल झाले होते. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासोबच नीता अंबानी (Neeta Ambani) पोहोचल्या होत्या. नीता अंबानीच्या प्रत्येक वस्तुंची फार चर्चा होत असते. त्यात या वस्तुच्या किंमतीचीदेखील फार चर्चा रंगते आता नीता अंबानी यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये निता अंबानी यांच्या हातात फोन दिसत आहे. आज आम्ही तुम्हाला या फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशनची माहिती देणार आहोत.
नीता अंबानींचे अनेक फोटो समोर आले आहेत, पण एका फोटोत नीता अंबानी यांच्या हातात अॅपल आयफोन 15 प्रो मॅक्स दिसत आहे. फोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर भारतात तो 265 जीबीसह 1,59,900 रुपयांपासून सुरू होतो. याशिवाय जसजसे स्टोरेज बदलते तसतसे फोनची किंमतही वाढत जाते. 15 सीरिजमधील हा सर्वात महागडा स्मार्टफोन असून टीबी स्टोरेजसह खरेदी करण्यासाठी तुम्हाला जवळपास 2लाख रुपये मोजावे लागू शकतात.
स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही फोन ऑनलाइन आणि अॅपल स्टोअर या दोन्ही वरून ऑर्डर करू शकता. त्यात तुम्हाला चांगलं डिझाइनही मिळतं. टायटॅनियम टचमुळे तुम्हाला खूप छान वाटेल. डिस्प्लेबद्दल तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही कारण यात 6.7 इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे जो खूप चांगला सिद्ध होतो. A17Pro Chip उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्हाला चांगला स्पीड मिळतो.
आयफोनची सर्वाधिक चर्चा त्याच्या कॅमेऱ्यामुळे होते. तुम्हीही उत्तम कॅमेरा असलेला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. कारण यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेटअप आहे जो तुम्हाला खूप चांगली पिक्चर क्वालिटी देतो. तसेही कंपनीने 15 प्रो सीरिजच्या कॅमेऱ्यावरही बरेच काम केले आहे.
या देशांमध्ये फोन मिळतील स्वस्त
Apple च्या अधिकृत वेबसाइटनुसार, भारतात iPhone 15 Pro Max च्या 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,59,900 रुपये आहे. तर, हेच फोन तुम्हाला दुबई आणि हाँगकाँगमध्ये स्वस्त मिळतील. हाँगकाँगमध्ये या फोनची किंमत HK $10199 आहे, जी भारतीय रुपयांमध्ये 1,08,058 रुपये आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही जवळपास 50,000 रुपये वाचवू शकता. 29 सप्टेंबरच्या एअर इंडियाच्या फ्लाइटचा डेटा पाहिला तर या देशात जाण्यासाठी विमान प्रवासाचा एकूण खर्च 28,138 रुपये आहे. फोन खरेदी केल्यानंतर, तुमची इच्छा असल्यास, तुम्ही हाँगकाँगमध्ये 1 किंवा 2 दिवस राहू शकता, ज्याची एकूण किंमत सुमारे 15,000 रुपये असेल. जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही पुन्हा भारतात परत येऊ शकता.
इतर महत्वाची बातमी-