एक्स्प्लोर

Mumbai Apple Store : भारतातील पहिलं अॅपल स्टोअर आजपासून मुंबईत सुरु होणार

Mumbai Apple Store : टेक विश्वातील दिग्गज कंपनी अॅपल आज (18 एप्रिल) मुंबईतआपले पहिले स्टोअर सुरु करणार आहे.

Mumbai Apple Store : टेक विश्वातील दिग्गज कंपनी अॅपल आज (18 एप्रिल) मुंबईत (Mumbai) आपले पहिले स्टोअर (Apple Store) सुरु करणार आहे. अॅपलचे सीईओ टिम कुक स्वतः सकाळी 11 वाजता याची सुरुवात करतील. अॅपलच्या वेबसाइटनुसार, स्टोअर सोमवारी बंद असेल आणि मंगळवार ते रविवार सकाळी 11 ते रात्री 10 या वेळेत खुले असेल. यानंतर, दुसरे अधिकृत स्टोअर 20 एप्रिल रोजी राजधानी दिल्लीत (New Delhi) सुरु होईल. Apple ने सोमवारी (17 एप्रिल) सांगितलं की भारतातील पहिले दोन स्टोअर या आठवड्यात उघडतील, हा कंपनीच्या विस्तार योजनेचा एक प्रमुख भाग आहे. मुंबई आणि दिल्लीत अॅपलची दोन दुकाने सुरु होत आहेत.

"अॅपल भारतात 25 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहे आणि या आठवड्यात कंपनी देशातील पहिले अॅपल स्टोअर उघडून मोठ्या विस्तारासाठी तयारी करत आहे," असं कंपनीने एका निवेदनात म्हटलं आहे. स्थानिक प्रभावानुसार दोन्ही स्टोअरची रचना करण्यात आली आहे. कंपनीचे सीईओ टिम कुक म्हणाले की, "भारतात एक सुंदर संस्कृती आणि अविश्वसनीय ऊर्जा आहे. आमच्या ग्राहकांना पाठिंबा देण्यासाठी, स्थानिक समुदायांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि मानवतेची सेवा करणाऱ्या नवकल्पनांसह एक चांगले भविष्य घडवण्यासाठी आम्ही एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत.

दरम्यान 2022-23 या आर्थिक वर्षात भारतातून Apple निर्यात 5 अब्ज यूएस डॉलर ओलांडण्याची अपेक्षा आहे. हा आकडा भारतात बनवलेल्या फोनच्या एकूण निर्यातीपैकी निम्मा आहे.

बीकेसीमध्ये भारतातील पहिलं अॅपल रिटेल स्टोअर

मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये भारतातील पहिले Apple रिटेल स्टोअर सुरु होणार आहे. ते 133 महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर घेतलं आहे, शिवाय ते 60 महिन्यांसाठी वाढवण्याचा पर्याय आहे. हे अॅपल स्टोअर 20 हजार 806 चौरस फुटांचं आहे, ज्याचे भाडे 42 लाख रुपये प्रति महिना आहे. अॅपलने आतापर्यंत आपली उत्पादनं Amazon सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे विकली आहेत.

टिम कुक भारतात

भारतातील पहिल्या वहिल्या अॅपल स्टोअरच्या लॉन्चिंगसाठी अॅपलचे सीईओ टिम कुक सोमवारी (17 एप्रिल) भारतात आले आहेत. "बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील नवीन अॅपल स्टोअरमध्ये ग्राहकांचे स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत," असं ट्वीट स्वत: टिम कुक यांनी केलं आहे. भारतात आल्यानंतर त्यांनी देशातील श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश अंबानी आणि ईशा अंबानी यांची भेट घेतली. सोबतच रिलायन्स रिटेलच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. यानंतर त्यांनी मुंबईतील अनेक उद्योजक आणि सेलिब्रिटींचीही गाठभेट घेतली. आपल्या भारत दौऱ्यात टिम कुक बुधवारी (19 एप्रिल) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांची भेट घेणार आहेत.

2017 मध्ये भारतात पहिल्यांदा आयफोनची निर्मिती

अॅपल 2017 पासून भारतात आयफोनचे उत्पादन करत आहे आणि त्यामुळे हजारो रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. रिटेल स्टोअर उघडल्यानंतर, कंपनी आपली पुरवठा साखळी आणखी मजबूत करेल आणि देशभरात आपला व्यवसाय वाढवेल. दरम्यान iPhones सह अॅपल भारतात iPads आणि AirPods देखील उत्पादन करण्याची योजना आखत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Embed widget