(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Smartphone Security : स्मार्टफोनचे 'हे' 7 सीक्रेट कोड लक्षात ठेवा, फोन हरवल्यावरही होईल मदत
Mobile Secret Codes : स्मार्टफोनच्या बाबतीत अनेक सीक्रेट कोड आहे, पण त्यातील काही महत्त्वाचे कोड तुम्हाला माहित आहेत का, कोडच्या मदतीने तुम्ही हरवलेला फोनही शोधू शकता.
Mobile Security : देशभरात करोडो स्मार्टफोन (Smartphone) वापरकर्ते आहेत. स्माटफोन हा आपल्या जीवनाचा जणू एक अविभाज्य भाग बनला आहे, असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. अनेक जणांच्या तर दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवटही फोनसोबत होतो. बहुतेक कामांसाठी आपण फोनवर अवलंबून असतो. पण, स्मार्टफोन बाबत आपल्याला सुरक्षेची काळजी घेणं गरजेचं आहे. स्मार्टफोन वापरताना तुम्हाला त्याबाबत सरक्षेच्या काही महत्त्वाच्या बाबी माहित असणं गरजेचं आहे.
स्मार्टफोन सुरक्षित कसा ठेवाल?
स्मार्टफोन वापरणाऱ्यांना फोनसंदर्भातील सीक्रेट कोड माहिती असणं आवश्यक आहे. स्मार्टफोनच्या बाबतीत अनेक सीक्रेट कोड आहे, पण त्यातील काही महत्त्वाचे कोड तुम्हाला माहित आहेत का, कोडच्या मदतीने तुम्ही हरवलेला फोनही शोधू शकता. स्मार्टफोन वापरकर्त्यांनी त्यांच्या स्मार्टफोनच्या सीक्रेट कोडचा मागोवा घेतल्यास तुम्ही सायबर गुन्ह्यांना बळीप पडणार नाहीत.
स्मार्टफोन यूजर्स को फोन के सीक्रेट कोड्स की जानकारी होनी चाहिए। वैसे तो स्मार्टफोन के सीक्रेट कोड्स की लिस्ट काफी लंबी है लेकिन आपको कुछ महत्वपूर्ण कोड्स हैं जिन्हें आपका जानना बहुत जररूी है।
— NCIB Headquarters (@NCIBHQ) November 5, 2023
01- *#21#: इस सीक्रेट कोड्स की मदद से आप यह जान सकते हैं कि आपकी कॉल, डेटा या फिर…
स्मार्टफोनचे सीक्रेट कोड
स्मार्टफोनच्या सीक्रेट कोडची यादी खूप मोठी आहे, पण राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोने अशा स्मार्टफोनसंबंधित महत्त्वाच्या सीक्रेट कोडची यादी जाहीर केली आहे. हे सीक्रेट कोड कोणते जे जाणून घ्या.
1) *#21#
या सीक्रेट कोडच्या मदतीने तुमचा कॉल, डेटा किंवा नंबर इतर कोणत्याही नंबरवर फॉरवर्ड झाला आहे की नाही, हे जाणून घेऊ शकता.
2) #0#
या सीक्रेट कोडच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनचा डिस्प्ले, स्पीकर, कॅमेरा, सेन्सर डायल करून व्यवस्थित काम करत आहे की नाही, हे तपासू शकता.
3) *#07#
हा सीक्रेट कोड तुमच्या फोनचे SAR मूल्य सांगतो. म्हणजेच या कोडच्या मदतीने तुम्ही फोनमधून निघणाऱ्या रेडिएशनची माहिती मिळवू शकता. त्याच्या मदतीने तुम्ही फोनमधून निघणाऱ्या रेडिएशनची माहिती मिळवू शकता. सार मूल्य नेहमी 1.6 पेक्षा कमी असावे.
4) *#06#
या सीक्रेट कोडच्या मदतीने तुम्ही तुमचा IMEI नंबर शोधू शकता. फोन हरवल्यास हा IMEI नंबर आवश्यक आहे.
5) ##4636##
या सीक्रेट कोडद्वारे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी, इंटरनेट, वायफायची माहिती जाणून घेऊ शकता.
6) ##34971539##
या सीक्रेट कोडद्वारे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची कॅमेरा माहिती जाणून घेऊ शकता. तुमचा कॅमेरा व्यवस्थित काम करत आहे की नाही, हे देखील तुम्हाला कळेल.
7) 2767*3855#
तुम्ही तुमच्या डायल पॅडवर हा सीक्रेट कोड टाइप केल्यास, तुमचा स्मार्टफोन रीसेट होईल. स्मार्ट फोन रीसेट केल्यानंतर फोनमधील संपूर्ण डेटा पूर्णपणे निघून जाईल. त्यामुळे फोन रिसेट करण्याआधी तुमचा डेटा कुठेतरी सेव्ह करा आणि नंतरच हा सीक्रेट कोड डायल करून फोन रिसेट करा.