एक्स्प्लोर

Sanchar Saathi Portal : मोबाईल चोरी किंवा हरवला आहे का? काळजी नको! सरकारच्या संचार सारथी पोर्टलच्या मदतीने शोधता येणार मोबाईल 

तुमचा मोबाईल जर का हरवला असेल, तर तो ब्लॉक करण्यासाठी तसेच ट्रॅक करण्यासाठी तुम्ही Sanchar Saathi Portal चा वापर करू शकता.

Mobile Phone lost or Stolen : सध्या मोबाईल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत. स्मार्टफोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यावर सर्वात मोठी चिंता असते ती त्यामध्ये असलेला वैयक्तिक डेटा लीक होण्याची. जाणून घेऊयात  संचार सारथी पोर्टलचा वापर कसा करावा

तुमचा मोबाईल जर का हरवला असेल, तर तो ब्लॉक करण्यासाठी तसेच ट्रॅक करण्यासाठी तुम्ही Sanchar Saathi Portal चा वापर करू शकता. यासाठी सर्वात आधी तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी लागेल. त्या कंप्लेंट नंबरच्या मदतीने संचार साथी पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला Tracking Number मिळेल त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या हरवलेल्या मोबाईलचे स्टेटस चेक करू शकता. तुम्हाला मोबाईल परत मिळाल्यानंतर तुम्ही याच पोर्टलचा वापर करून त्याला अनब्लॉक सुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही sanchar saathi portal चा वापर करू शकता.

मोबाईल हरवल्यावर किंवा चोरी झाल्यावर कसा ब्लॉक करावा

संचार साथी पोर्टलवर हरवलेल्या मोबाईलची तक्रार नोंदवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला  https://sancharsaathi.gov.in/  या वेबसाइटला भेट द्यावी लागेल .

- आता तुम्हाला होमपेजच्या Citizen Centric Services या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

- या पर्यायानंतर तुम्हाला तुमच्या हरवलेला किंवा चोरलेला मोबाईल ब्लॉक करण्याचा पर्याय मिळेल. 

- Block Your Lost पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म मिळेल. 

- हा फॉर्म काळजीपूर्वक भरा आणि नंतर मोबाइल नंबरसह IMEI नंबर नमूद करा. 

- तुम्हाला स्मार्टफोनचा मॉडेल नंबर, मोबाइल खरेदीचे बिल देखील अपलोड करावे लागेल.

- आता तुम्हाला मोबाईल हरवला किंवा चोरीला गेल्याची तारीख, वेळ, जिल्हा आणि राज्याची माहिती द्यावी लागेल.

- यासोबतच तुम्हाला एफआयआरची प्रतही जोडावी लागेल. 

- आता तुम्हाला वैयक्तिक माहिती जसे की नाव, ईमेल आयडी, पत्ता इत्यादी द्यावे लागेल. 

- शेवटी तुम्हाला डिस्क्लेमर निवडून फॉर्म सबमिट करावा लागेल. 

- फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचा स्मार्टफोन ब्लॉक केला जाईल. 

तक्रारीसाठी हे लक्षात ठेवा

संचार साथी पोर्टलवर तुमच्या नावावर किती सिमकार्ड सक्रिय आहेत हे देखील तुम्ही शोधू शकता.  जर तुमचा स्मार्टफोन चोरीला गेला असेल तर तुम्ही या पोर्टलवर तक्रार कशी नोंदवू शकता. मात्र तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तक्रार नोंदवण्यासाठी IMEI नंबर असणे आवश्यक आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

PM Modi On Rahul Gandhi : 'जशी अहंकाराने लंका जाळली होती तशीच त्यांची स्थिती झाली आहे', लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राहुल गांधींवर घणाघात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Embed widget