Earning from YouTube : आता YouTube वरून पैसे कमावणं झालं सोपं, Shorts Video बनवून होऊ शकता मालामाल
YouTube वर व्हिडीओ बनवल्यानंतर लगेच कमाईला सुरूवात होत नाही. त्यासाठी काही महिने वाट पाहावी लागते. पैसे कमावण्यासाठी वेळ आणि परिश्रम लागतात. तसेच, कामात सातत्य राखण्यासाठी संयमाची कसोटी लागते.
Earn Money from YouTube : सध्या अनेकजण सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मचा चांगलाच वापर करत आहेत. अनेकजण आपल्या मोबाईलसमोर एखाद्या विषयावर मांडणी करतात आणि तो रेकॉर्डेड व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करतात.यामध्ये कुणी युट्युब (YouTube), तर कुणी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर आपला व्हिडीओ शेअर करतात. अशातच सध्या लोकांमध्ये युट्युब शॉर्ट्स व्हिडीओ तयार करण्याचा ट्रेंड प्रचंड लोकप्रिय आहे. हे तयार केलेले व्हिडीओ युट्युबवर अपलोड करतात. हा व्हिडीओ बघितल्यानंतर युजर्सकडून त्या व्हिडीओवर प्रचंड कॉमेंट्स येतात, तर कुणी लाईक करतं, कुणी अनलाईक करतं. तुम्हाला लोकांशी कनेक्ट राहायला त्यांना वेगळेगळ्या विषया माहिती द्यायला आवडत असेल, तर युट्युब हा उत्तम प्लॅटफॉर्म आहे. तसेच, तुमच्याकडे एखादी कला असेल, तर युट्युबच्या प्लॅटफॉर्मचा चांगला वापर केला जाऊ शकतो. तुम्ही अनेकवेळा ऐकलं असेल की, युट्युबच्या माध्यामातून अनेक लोक पैसे कमवत आहेत. तुम्हीसुद्धा युट्युबसारख्या सोशल प्लॅटफॉर्मवरून चांगले पैसे कमावू शकता. युट्युबवरून पैसे कमावण्याचे (Earning from YouTube) अनेक मार्ग उपलब्ध आहेत. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...
YouTube वर पैसे कमावण्यासाठी आहेत अनेक मार्ग
तुम्हाला युट्युबच्या प्लॅटफॉर्मवरून पैसे कमावण्यासाठी युट्युब पार्टनर प्रोग्राममध्ये सहभागी व्हावं लागतं. त्यासाठी आधी तुमचं युट्युब चॅनेल सुरू करावं लागेल. चॅनेलवर गेल्या 12 महिन्यात कमीत कमी 1,000 हजार सब्सक्राइबर्स असायला हवेत आणि तुमच्या कोणत्याही एका व्हिडीओवर 4,000 हजार तासांचा वॉच टाईम असायला हवा. यानंतर तुमचं चॅनेल युट्युब प्रोग्रामसाठी पात्र ठरू शकते. तुम्ही एकदा युट्युब प्रोग्राममध्ये सामिल झाल्यानंतर तुमच्या व्हिडीओवर दिसणाऱ्या जाहिरातीच्या माध्यमातून पैसे कमवू शकता.
युट्युबसारख्या प्लॅटफॉर्मवरून पैसे कमविण्याचा आणखीन एक मार्ग म्हणजे प्रॉडक्टची विक्री करणे. जसे की, टी-शर्ट, टोपी, युनिक कपडे, वेगवेगळ्या प्रकारची दागदागिने आणि मिल्क प्रॉडक्ट इत्यादी. तुमच्या युट्युब प्लॅटफॉर्मवरून तुमच्या आणि इतरांच्या प्रॉडक्टची विक्री करू शकता. इतर लोकांच्या प्रॉडक्ट्सचंही तुमच्या चॅनेलवरून प्रोमोशन केल्यामुळे तुम्हाला काही मोबदलाही मिळू शकतो. तुम्ही स्पॉन्सर्ड कंटेट बनवूनही युट्युब चॅनेलच्या माध्यमातून पैसे कमवू शकता. यासाठी तुम्हाला प्रॉडक्ट्सबद्दल माहिती देऊन भरपूर प्रचार करावा लागेल. युट्युब चॅनेलवरून पैसे कमवायचे असतील, तर एखाद्या कंपनीकडून स्पॉन्सरशिप मिळविण्यासाठी प्रयत्न करायला हवं. यानंतर एखाद्या विषयावर माहितीपर आणि मनोरंजन करणारे व्हिडीओ बनवायला सुरूवात करावी.
YouTube वरून पैसे कमावण्यासाठीचे एक्स्ट्रा टीप्स
YouTube वर व्हिडीओ बनवल्यानंतर लगेच अर्निंगला सुरूवात होत नाही. त्यासाठी काही महिने वाट पाहावी लागते. पैसे कमावण्यासाठी वेळ आणि प्रचंड परिश्रम लागतात. तसेच, कामात सातत्य राखण्यासाठी संयमाची कसोटी लागते. यानंतर तुम्ही YouTube व्हिडोओ बनवून YouTube प्लॅटफॉर्मवरून पैसे कमवायला सुरूवात करू शकता. यासंबंधित तुमच्यासाठी काही युट्युब टीप्स खालीलप्रमाणे देत आहोत जे तुम्हाला उपयोगाला येणार आहेत.
1. चांगल्या क्वालिटीचे व्हिडीओ बनवा जेणेकरून जास्तीत जास्त लोक आवडीनं व्हिडीओ पाहायला हवे.
2. सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मवर आपला व्हिडीओ शेअर करा. यामुळे जास्तीत जास्त लोक व्हिडीओ पाहतील.
3.तुम्हाल फॉलो करणाऱ्या प्रेक्षकांसोबत सातत्यानं संपर्कात राहा, त्यांच्याशी चर्चा करा आणि आपल्या चॅनेलच्या स्वत:चा एक ग्रुप तयार करा.
4. तुम्ही व्हिडीओ बनवण्यात सातत्या ठेवा आणि थोडा संयम बाळगा. कारण तुम्हाला एक यशस्वी युट्युबर व्हायचं असेल, तर चॅनेल प्रसिद्ध होण्यासाठी वेळ लागतो.
युट्युब शॉट्स आहे तरी काय?
सध्या युट्युबनं शॉर्ट्स व्हिडीओ सुरू केली आहेत. या युट्युब शॉर्ट्समध्ये युजर्स 60 सेंकदापर्यंतचे लहान लहान युट्युब बनवून शेअर करू शकतात. सध्या तर शॉर्ट्स व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. तुम्ही युट्युब शॉर्टसवरून तुमच्या युट्युब चॅनेलला मॉनिटाईज करू शकता. सध्या लोकांमध्ये युट्युब शॉर्ट्स व्हिडीओचा ट्रेंड प्रचंड लोकप्रिय आहे.