Jio Recharge Offers : Airtel ला टक्कर देण्यासाठी Jio ने आणला नवा प्लॅन! 398 रुपयांत Unlimited Data, SMS आणि Jio TV
जिओने 398 रुपयांचा नवा प्लॅन लाँच केला आहे. यात तुम्हाला अनेक स्पेशालिटी मिळणार आहेत. एअरटेलला टक्कर देण्यासाठी जिओने हा नवा प्लॅन आणला आहे.
Jio Recharge Offers : जिओने 398 रुपयांचा नवा प्लॅन लाँच (Jio Recharge Offers) केला आहे. यात तुम्हाला अनेक स्पेशालिटी मिळणार आहेत. एअरटेलला टक्कर देण्यासाठी जिओने हा नवा प्लॅन आणला आहे. डिसेंबरमध्ये कंपनीने हा प्लॅन लाँच केला आहे, युजर्स नेट आणि कॉलिंगचा सर्वाधिक वापर करतात. त्याच्यासाठीच हा प्लॅन लाँच करण्यात आला आहे. चला तर मग तुम्हाला यात कोणते ऑफर्स मिळणार आहेत जाणून घ्या...
398 रुपयांच्या नव्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर त्याची व्हॅलिडिटी 28 दिवसांसाठी मिळते. पण त्यात भरपूर डेटा आहे. कारण या प्लानमध्ये दररोज 2 GB डेटा मिळतो. तसेच 100 एसएमएसची सुविधाही देण्यात आली आहे. म्हणजेच तुम्हाला एसएमएसचं टेन्शन घेण्याचीही गरज नाही. तसेच जिओ टीव्ही प्रीमियमचे सब्सक्रिप्शन मिळते.
मात्र, बऱ्याच दिवसांपासून जिओ आपल्या प्लॅनमध्ये बदल करण्याच्या विचारात होतं. विशेषत: ओटीटीचा अधिक वापर करणाऱ्या असे युजर्सवर अधिक टार्गेट करण्याकडे त्याचा कल होता. नुकतेच जिओकडून ओटीटीवर क्रिकेट लाईव्हही सुरू करण्यात आले होते. विशेष म्हणजे यासाठी युजर्सना कोणत्याही सब्सक्रिप्शनची ही गरज नव्हती. अशा तऱ्हेने कोट्यवधी लोकांनी लाईव्ह क्रिकेट सामने पाहिले.
जिओ 398 प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर ते थोडे कमी व्हॅलिडिटी वाटू शकते. पण त्यात सोयी-सुविधा बऱ्यापैकी चांगल्या मिळत आहेत. कारण ओटीटी सब्सक्रिप्शनही मिळते. ओटीटी सब्सक्रिप्शनबद्दल बोलायचे झाले तर यात Prime Video, Lionsgate Play, Discovery+, Docubay, Hoichoi, SunNXT, Planet Marathi, Chaupal, EpicON आणि Kanccha Lanka यांचे सब्सक्रिप्शन मिळणार आहे. तुम्हालाही हा प्लॅन खरेदी करायचा असल तर माय जिओ अॅपवरून खरेदी करू शकता. तसेच पेटीएम, फोनपेद्वारे रिचार्ज करता येईल.
Jio unlimited 5G data plan लाँच
रिलायन्स जिओने 909 रुपयांचा (Jio unlimited 5G data plan) नवा प्री-पेड प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन 5G डेटासह येतो. तसेच ओटीटी अॅप्सचे (Reliance Jio) सब्सक्रिप्शन मिळते. जिओने 909 रुपयांचा अनलिमिटेड डेटा प्लॅन लाँच केला आहे. ट्रायच्यावतीने जिओ आणि एअरटेलला अनलिमिटेड डेटाच्या अटी आणि शर्ती स्पष्टपणे सांगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशावेळी अनलिमिटेड 5G डेटा म्हणजे 30 दिवसांसाठी जास्तीत जास्त 300 जीबी डेटा मिळणार आहे.