(Source: ECI/ABP News/ABP Majha)
iPhone Flip : आता अॅपल फोल्डेबल फोन, आयपॅड लॉंच करण्याच्या तयारीत; किती असेल किंमत?
iPhone Flip : आतापर्यंत सॅमसंग, विवो, ओप्पो, वनप्लस सारख्या कंपन्यांनी लाँच केला आहे, परंतु आता अॅपल कंपनी फोल्डेबल आणि फ्लिप फोन काम करत आहे.
iPhone Flip : जगभरातील स्मार्टफोन कंपन्या आपल्या स्मार्टफोनमध्ये दिवसेंदिवस नवनवीन फीचर्स आणण्यासाठी नवनवीन प्रयोग करत असतात. फोल्डेबल फोन आणि फ्लिप फोन असे नवे प्रयोग आपण आतापर्यंत सॅमसंग, विवो, ओप्पो, वनप्लस सारख्या कंपन्यांनी लाँच केला आहे, परंतु आता अॅपल (Apple Company) कंपनी फोल्डेबल (iPhone ) आणि फ्लिप फोनवर काम करत आहे.
या फोनसंदर्भात अजून कोणतीही खात्रीशीर बातमी समोर आलेली नसली तरी अनेक रिपोर्ट्समध्ये असे म्हटलं जातंय की, अॅपल फ्लिप आयफोन आणि आयपॅडवर काम करत आहे. हे फोन, आयपॅड कदाचित डिव्हाईसच्या मध्यभागून प्लिप होऊ शकतात एका रिपोर्टनुसार, अॅपल फोल्डेबल डिव्हाइसवर काम करत आहे, जे पुस्तकासारखे फोल्डेबल डिव्हाइस आहे ज्याच्या स्क्रीनचा आकार 76 ते 84 इंचदरम्यान आहे, त्यामुळे अॅपल आपला आयफोन किंवा आयपॅड फोल्ड करणारे डिव्हाइस लाँच करू शकते.
फिचर्स कसे असतील?
टॉम्सगाइडच्या ताज्या अहवालानुसार, अॅपल आयफोन फ्लिप फोनवर काम करत आहे, जो अॅपलचा पहिला फोल्डेबल डिव्हाइस असू शकतो. मिंग-ची कुओ यांनी दावा केला आहे की, पहिल्या आयफोन फोनमध्ये 8 इंचाचा डिस्प्ले असू शकतो, जो गॅलेक्सी झेड फोल्ड 4 पेक्षा जास्त असेल, ज्यामध्ये सॅमसंगने 7.6 इंचाची स्क्रीन दिली होती. 8 इंचाचा आयफोन फ्लिप ओपन झाल्यावर तो आयपॅड म्हणून काम करेल. अॅपलने काही वर्षांपूर्वी लाँच केलेल्या टॅबलेट आयपॅड मिनीची स्क्रीन साईज 8.3 इंच होती.
Apple Flip Phone, Ipad ची किंमत किती असू शकते?
मात्र, अॅपलच्या फोल्डेबल फोनच्या डिस्प्लेबाबत निश्चितपणे काहीही सांगता येत नाही कारण काही रिपोर्ट्सनुसार कंपनी 9 इंचाच्या डिस्प्लेवर काम करत आहे, काही रिपोर्ट्सनुसार कंपनी 7.5 इंच ओएलईडी डिस्प्लेसह फ्लिप फोन लाँच करणार आहे.मात्र, अॅपलच्या फ्लिप आयफोनच्या स्क्रीन साइज कितीही असला तरी अनेक अफवा पाहता कंपनी लवकरच आपला पहिला फोल्डेबल फोन सादर करणार असल्याचे दिसत आहे. अशापरिस्थितीत या फोनच्या संभाव्य किंमतीचा प्रश्न तुमच्या मनात येत असेल. मात्र, या प्रश्नाचे उत्तर देणे अवघड आहे, परंतु टॉम्सगाईडच्या अहवालानुसार आयफोन फ्लिपची किंमत सुमारे 2000 डॉलर म्हणजेच सुमारे 1.65 लाख रुपये असू शकते.
इतर महत्वाची बातमी-