iPhone 14 : अँड्रॉईड फोनच्या किंमतीत आता खरेदी करू शकता iPhone 14 ,वाचा सविस्तर
तुम्हालाही आयफोन खरेदी करण्याची इच्छा आहे आणि किमत अधिक असल्यामुळे तुम्हाला खरेदी करणे शक्य होत नाही. तर तुमच्याकरीता एक खुशखबर आहे. तुम्ही आता अँड्रॉईड फोनच्या किंमतीत आयफोन खरेदी करू शकता.
iPhone 14 Offer : तुम्हाला आयफोन (Iphone) खरेदी करण्याची इच्छा आहे पण कमी बजेटमुळे तुम्हाला ते शक्य होत नाही. तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आता अँड्रॉईड फोनच्या किंमतीत आयफोन खरेदी करता येणार आहे. ई-कॉमर्स वेबसाइट (E-Commerce Website) फ्लिपकार्टवर (Flipkart) iPhone 14 वर भन्नाट आॅफर दिली जात आहे. हा मोबाईल खरेदी करताना तुम्ही जवळपास 50,000 रूपये वाचवू शकतात. iPhone 14 हे अॅपल कंपनीकडून तयार करण्यात आलेले सगळ्यात लोकप्रिय माॅडेल आहे. कंपनीने आयफोन 14 , आयफोन 14 प्लस , आयफोन 14 प्रो आणि आयफोन 14 प्रो मॅक्स लाँच केले आहे. iPhone 14 सध्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. फोनवर उपलब्ध असलेल्या बँक आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही जवळपास अर्ध्या किमतीत ते खरेदी करू शकता.
ही आहे खास ऑफर
फ्लिपकार्टवर iPhone 14 ची किंमत 69,999 आहे. जी अॅपलच्या स्टोअर किंमतीपेक्षा 9,901 रूपयांने कमी आहे. याशिवाय HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डने पैसे देऊन फोन खरेदी केल्यास तुम्हाला 4,000 रूपयांची सूट मिळेल. यासोबतच या फोनची किंमत 65,999 एवढी होईल. फ्लिपकार्टवर 35,000 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंटही (Exchange Discount) दिली जात आहे. जुना फोन परत करून नवीन आयफोन घेतल्यास फोनची किंमत आणखी कमी होईल. जर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळत असेल तर तुम्ही हा फोन 30,999 रुपयांना खरेदी करू शकता. म्हणजेच, तुम्ही Android च्या बजेटमध्ये iPhone 14 खरेदी करू शकता. मात्र, तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असेल तेव्हाच तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ घेता येणार आहे.
iPhone 14 च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला फोनमध्ये 6.1 इंच सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले, A15 बायोनिक चिप आणि ड्युअल कॅमेरा सेटअप मिळत आहे. तुम्ही हा फोन 128GB, 256GB आणि 512GB व्हेरिएंटमध्ये खरेदी करू शकता. कनेक्टिव्हिटी पर्यायांबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये 5G सपोर्ट, वाय-फाय, ड्युअल सिम, ब्लूटूथ, जीपीएस आणि चार्जिंगसाठी लाइटनिंग पोर्ट आहे. फोटोग्राफीसाठी, iPhone 14 मध्ये ड्युअल रीअर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये मोठा f/1.5 अपर्चर, सेन्सर-शिफ्ट OIS आणि 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेकेंडरी शूटर असलेला 12-मेगापिक्सेल वाइड-अँगल मुख्य सेन्सरचा समावेश आहे.
इतर महत्वाच्या बातम्या