(Source: Poll of Polls)
Social Media : आता Instagram वर फक्त फोटो आणि रिल्सच नाही तर भन्नाट गेम्सही खेळता येणार; 'या' स्टेप्स फॉलो करा
Social Media : इन्स्टाग्रामवर आता गेम्सही खेळता येणार आहेत. हीडन फीचरच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे.
Social Media : आजकालच्या युगात सोशल मीडियावरच (Social Media) सर्व गोष्टी अवलंबून असतात. जसे की, ते आपल्या आयुष्याचा एक भागच आहेत. जर तुम्ही इंस्टाग्राम (Instagram) वापरत असाल आणि पोस्ट्स आणि रील्स पाहण्याचा कंटाळा आला असेल, तर आम्ही तुमच्यासाठी इंस्टाग्रामचं 'हिडन' फीचर आणलं आहे. प्रवासात किंवा तुमच्या मोकळ्या वेळेत तुमचे मनोरंजन करण्यासाठी तुम्ही ही युक्ती वापरू शकता. या ट्रिकचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याचा वापर केल्यास तुम्हालाही मजा येईल आणि कोणाचं नुकसानही होणार नाही. या ट्रिकबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
ही ट्रिक वापरून तुम्हाला इन्स्टाग्रामवर एकही पैसा खर्च करावा लागणार नाही. नेमकी ही ट्रिक आहे तरी काय याबाबत जाणून घेऊयात.
'हे' इंस्टाग्रामचं हिडन फीचर
तुमचे इन्स्टाग्रामवर जास्त फॉलोअर्स नसल्यास किंवा तुम्हाला इन्स्टाग्रामवर रील्स पाहण्याचा कंटाळा आला असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण इथे आम्ही तुम्हाला अशा गेमबद्दल सांगणार आहोत जो तुम्ही प्रवासात किंवा तुमच्या रिकाम्या वेळेत इंस्टाग्रामवर खेळू शकता. हा गेम तुम्ही तासन्तास खेळू शकता. यासाठी तुम्हाला कोणताही पैसा खर्च करावा लागणार नाही.
तर, beebomco या नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर या हिडन फीचरच्या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. यामध्ये हा गेम कसा खेळायचा याची माहिती आहे. यासाठी काही सोप्या स्टेप्स सांगण्यात आल्या आहेत. ज्यावर तुम्ही गेम खेळू शकता.
'अशा' प्रकारे इन्स्टाग्रामवर तुम्ही गेम खेळू शकता :
हा गेम खेळण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला इन्स्टाग्राम ॲप सुरू करावं लागेल.
आता कुणाच्याही किंवा स्वतःच्या चॅटबॉक्समध्ये जा.
या ठिकाणी आपण एखाद्याला जसे इमोजी पाठवतो, त्याप्रमाणे कोणताही एक इमोजी सेंड करा.
आता सेंड केलेल्या इमोजीवर क्लिक करा.
तुमचा पॉंग हा गेम सुरू होईल.
या खेळात स्क्रीनवर तुम्ही पाठवलेला इमोजी एखाद्या चेंडूप्रमाणे फिरेल. तो जसा खाली येऊ लागेल तसे तुम्हाला स्क्रीनवर दिसणाऱ्या काळ्या रंगाच्या बोर्डने झेलायचा आहे.
हा खेळ खेळताना तुमचा झालेला स्कोअर फोनच्या उजव्या कोपऱ्यात दिसत राहील.
तसेच तुम्ही खेळातून आऊट म्हणजेच बाद झाल्यानंतर, तुमचा हायस्कोरदेखील सेव्ह राहणार आहे.
अशा पद्धतीने तुम्ही इन्स्टाग्रामवर आता गेमदेखील खेळू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :