एक्स्प्लोर
तुमच्या जुन्या नंबरवर रिलायन्स जिओचे 4G कसं वापराल?

1/6

सध्या रिलायन्स जिओच्या 4G प्रिव्ह्यू ऑफर अंतर्गत, 90 दिवसांसाठी 4G चा फ्री डेटा वापरण्यास मिळत आहे.
2/6

तुम्हाला तुमच्या जुन्याच नंबरवर रिलायन्स 4G सेवेचा वापर करायचा असेल तर तुमचा मोबाईल नंबर रिलायन्स जिओमध्ये पोर्ट करावा लागेल. यासाठी तुमच्या मेसेज बॉक्समध्ये PORT असे लिहून त्यापुढे तुमचा मोबाईल नंबर लिहावा, आणि हा मेसेज 1900 या नंबरवर पाठवावा.
3/6

हा मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तत्काळ रिप्लाय येईल. या मेसेजमध्ये एक कोड नंबर असेल. हा कोड नंबरसोबत ओळखपत्र आणि पासपोर्ट साईज फोटो घेऊन रिलायन्स स्टोअरशी संपर्क साधावा लागेल.
4/6

रिलायन्स स्टोअरमध्ये कोड आणि संबंधित सर्व कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर रिलायन्स जिओच्या 4G प्रिव्ह्यू ऑफरचा लाभ घेऊ शकता.
5/6

वास्तविक, रिलायन्स जिओच्या 4G सेवेचा लाभ जुन्या नंबरवर घेण्यासाठी तुमच्या 3G फोनची सिस्टीम 4.4 किटकॅट असणे गरजेचे आहे.
6/6

सध्या रिलायन्स जिओच्या स्वस्त डेटा पॅकमुळे प्रत्येकाच्याच तोंडामध्ये रिलायन्स जिओचेच नाव आहे. रिलायन्स जिओच्या या नव्या ऑफरमध्ये कमी किमतीत 4G इंटरनेट सेवेसहित इतर अनेक सेवांचा लाभ मिळत आहे. पण तुम्ही तुमच्या जुन्याच नंबरवर रिलायन्स जिओचा लाभ कसा घेऊ शकता? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Published at : 13 Sep 2016 06:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
