Windows 11 फॅक्टरी रीसेट कसा करायचा? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
How to Factory Reset Windows 11: इंटरनेट आणि तंत्रज्ञानामुळे आपले जीवन पूर्वीपेक्षा सहज आणि सोपे झाले आहे. अभ्यासापासून ते कामापर्यंत, आज सर्व काही डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट इत्यादीद्वारे केले जाते.
How to Factory Reset Windows 11: इंटरनेट आणि तंत्रज्ञानामुळे आपले जीवन पूर्वीपेक्षा सहज आणि सोपे झाले आहे. अभ्यासापासून ते कामापर्यंत, आज सर्व काही डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट इत्यादीद्वारे केले जाते. आज ऑफिसमधली बरीचशी कामे लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरच होतात. हे केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोक यावर काम करतात. आजच्या काळात प्रत्येकाच्या घरांमध्ये लॅपटॉप असणं जणू आवश्यक झालं आहे. जेव्हा आपण लॅपटॉपवर सतत काम करतो किंवा वेळोवेळी त्याची सेटिंग्ज बदलत राहतो, तेव्हा कधी-कधी तो नीट काम करत नाही.
जर तुम्ही थर्ड पार्टी अॅप किंवा सुरक्षित नसलेली वेबसाइट अॅक्सेस केली, तर लॅपटॉपमध्ये हानिकारक मालवेअर व्हायरस देखील प्रवेश करतात. ज्यामुळे लॅपटॉप स्लो काम करतो आणि नंतर आपल्याला त्यातून चिडचिड होऊ लागते. जर तुम्ही असा लॅपटॉप किंवा डेस्कटॉप चालवत असाल ज्यामध्ये Windows 11 किंवा इतर कोणतीही विंडो इन्स्टॉल केलेली असेल, तर आज जाणून घ्या की तुम्ही ते कसे रीसेट करू शकता. रीसेट केल्याने लॅपटॉप अगदी नवीन बनतो आणि त्याच्या डीफॉल्ट सेटिंगमध्ये येतो, ज्यामुळे लॅपटॉप अधिक चांगलं आणि फास्ट काम करतो.
How to Factory Reset Windows 11: असं करा विंडोज 11 रीसेट
सर्वातआधी तुमच्या लॅपटॉपच्या सेटिंग्जमध्ये जा. येथे तुम्हाला 'अपडेट आणि सिक्युरिटी मेनू' वर जावे लागेल. जिथे तुम्हाला रिकव्हरीचा पर्याय दिसेल. रिकव्हरी ऑप्शनच्या आत तुम्हाला 'Reset your PC' चा पर्याय मिळेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. आता येथे तुम्हाला अनेक पर्याय मिळतील, ज्यामध्ये तुम्हाला वैयक्तिक माहिती सेव्ह करायची आहे की हटवायची आहे? हे निवडायचे आहे. तुमच्या गरजेनुसार पर्याय निवडल्यानंतर त्याची पुष्टी करा. अशा प्रकारे फॅक्टरी रीसेट सुरू होईल आणि सुमारे 4 ते 5 मिनिटांत तुमचा लॅपटॉप अगदी नवीन आणि डीफॉल्ट सेटिंगमध्ये येईल.
Windows 11: विंडोज 11 वैशिष्ट्य
विंडोज 11 मध्ये एक नवीन डिझाइन दिसत आहे, ज्यामध्ये मायक्रोसॉफ्टने मॉडर्न साउंड दिला आहे. यामध्ये यूजर्सना एक फ्रेश आणि क्लीन डिझाइन मिळते. Windows 11 मध्ये युजर्स स्टार्ट मेनू मध्यभागी ठेवण्यास सक्षम असतील. पूर्वी ते डाव्या बाजूला असायचे. मायक्रोसॉफ्टच्या मते, विंडोज 11 हे विंडोजचे आतापर्यंतचे सर्वात जबरदस्त डिझाइन आहे. जे युजर्सला खूप आवडेल. Windows 11 टच, डिजिटल पेन आणि व्हॉइस इनपुटला देखील सपोर्ट करतो.