एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Google चा मोठा निर्णय! Naukri आणि Shaadi.com सह 10 ॲप Play Store काढून टाकणार

Google Pay Store : Google ने आपल्या Play Store वरून 10 लोकप्रिय ॲप्स काढून टाकण्याची तयारी सुरू केली आहे.

Google Play Store Billing Issue : गुगल प्ले स्टोअरच्या (Google Play Store) बिलिंगचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. अमेरिकन प्ले स्टोअर कंपनीने बिल न भरणाऱ्या ॲप डेव्हलपर्सवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. Google Play Store वरून 10 भारतीय कंपन्यांचे ॲप काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. यामध्ये Naukri.com, Shaadi.com, 99 acres.com या लोकप्रिय ॲप्सच्या नावांचा समावेश आहे. सर्च इंजिन कंपनीच्या म्हणण्यानुसार, या ॲप डेव्हलपर्सने त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही, त्यामुळे ही कारवाई करण्यात येत आहे. 

Google ने Google Play Store चे पेमेंट पॉलिसी अपडेट केली आहे. या भारतीय कंपन्यांनी प्ले स्टोअरचे सेवा शुल्क भरलेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यामुळे नाराज होऊन गुगल आपल्या प्ले स्टोअरवरून 10 भारतीय ॲप्स काढून टाकत आहे. या कंपन्या Google ला सेवा शुल्क भरण्यात सतत अपयशी ठरल्या आहेत. यामध्ये कोणकोणत्या अॅप्सचा समावेश आहे ते जाणून घेऊयात. 

हे ॲप्स Google Play Store वरून काढून टाकले जातील

Google Play Store वरून जे 10 ॲप्स काढून टाकणार आहे त्यात Shaadi.com, Quack Quack, Stage, InfoEdge च्या मालकीचे ॲप्स जसे की, Naukri.com आणि 99 acres.com यांचा समावेश आहे. भारतीय स्टार्टअप आणि गुगल यांच्यात सेवा शुल्काबाबत वाद सुरू आहे. स्टार्टअपचे म्हणणे आहे की गुगलची सेवा शुल्क खूप जास्त आहे.

गुगलच्या उच्च शुल्काचा निषेध

Google Play Store वरून ॲपमधील खरेदी आणि ॲप डाउनलोड करण्यावर 26 टक्के सेवा शुल्क कापते. या गोष्टीला स्टार्टअप कंपन्यांचा विरोध आहे. Google ने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये पेमेंट पॉलिसी अंतर्गत ॲप काढून टाकल्याचा उल्लेख केला आहे. तसेच, कंपनीने ब्लॉग पोस्टमध्ये कोणत्याही कंपनीचे नाव दिलेले नाही.

3 वर्षांचा कालावधी दिला

गुगलने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या कंपन्यांना तीन वर्ष आणि तीन आठवड्यांचा कालावधी दिल्यानंतर आम्ही आवश्यक ती पावले उचलली आहेत. यामुळे कंपनीचे धोरण अमलात आणण्यास मदत होईल, असा विश्वास गुगलला आहे. जगाच्या कोणत्याही भागात आमच्या धोरणांचे उल्लंघन झाल्यास आम्ही हेच करतो असंही गुगलने आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये स्पष्टच म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या : 

WiFi Safety Options : WiFi पासवर्ड विसरलात? काळजी करण्याची गरज नाही; 'या' सोप्या टिप्स फॉलो करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians : लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
Parth Pawar: अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; मी अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; मी अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
Eknath Shinde  : एकनाथ शिंदेंनी अर्थशास्त्र बघून नव्हे तर ह्रदयशास्त्र पाहून काम केलं, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, सुधीर मुनगंटीवार म्हणाले...
एकनाथ शिंदे म्हणाले नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा निर्णय मान्य, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, मुनगंटीवार म्हणाले...
Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHA
Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHA
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Pawar PC | निवडणूक आयोगाने आम्ही सांगू ती मशीन कॅमेऱ्याच्या निगराणीखाली उघडावीत- रोहित पवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 11 November 2024Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHAEknath Shinde Shayri | जीवन मे असली उडान अभी बाकी है, शायरी म्हणत मांडली शिंदेंनी भावना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
Parth Pawar: अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; मी अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; मी अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
Eknath Shinde  : एकनाथ शिंदेंनी अर्थशास्त्र बघून नव्हे तर ह्रदयशास्त्र पाहून काम केलं, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, सुधीर मुनगंटीवार म्हणाले...
एकनाथ शिंदे म्हणाले नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा निर्णय मान्य, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, मुनगंटीवार म्हणाले...
Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHA
Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHA
Eknath Shinde PC : भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा,  मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा, मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
Ekanath Shinde : महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदेंचं स्थान काय? मुख्यमंत्र्यांचं स्पष्टच उत्तर; भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदेंचं स्थान काय? मुख्यमंत्र्यांचं स्पष्टच उत्तर; भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
Prithvi Shaw : ज्याची तुलनाच लहान वयात सचिन सेहवागशी झाली तोच थेट जमिनीवर आला, पाँटिंगही हबकला; पृथ्वी शॉचं 'विमान' इतक्यात स्वस्तात जमिनीवर का आलं?
ज्याची तुलनाच लहान वयात सचिन सेहवागशी झाली तोच थेट जमिनीवर आला, पाँटिंगही हबकला; पृथ्वी शॉचं 'विमान' इतक्यात स्वस्तात जमिनीवर का आलं?
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
Embed widget