Google Software : Google कडून भारतासाठी इंग्रजी आणि हिंदीत AI सर्च टूल सादर; कसे वापराल? वाचा संपूर्ण प्रक्रिया
Google Software : अल्फाबेटची कंपनी Google ने भारत आणि जपानमधील यूजर्ससाठी आपल्या सर्च टूलमध्ये जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) सादर केले आहे.
Google Software : जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन म्हणजे गुगल (Google). आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास आपण गुगलवर जाऊन ती शोधत असतो. आता याच आघाडीच्या कंपनीने भारतासाठी इंग्रजी आणि हिंदीमध्ये AI सर्च टूल सादर केले आहे. अल्फाबेटची कंपनी Google ने भारत आणि जपानमधील यूजर्ससाठी आपल्या सर्च टूलमध्ये जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) सादर केले आहे. गुगलने त्यामध्ये काही फीचर्सचा समावेश केला आहे. ज्यामुळे सर्च पूर्वीपेक्षा अधिक सहज आणि स्मार्ट होईल असं कंपनीचं म्हणणं आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, याआधी ही सुविधा फक्त अमेरिकेत सुरू करण्यात आली होती.
जे यूजर्स सर्च लॅब्सच्या माध्यमातून फीचरची चाचणी करण्यासाठी साइन अप करतात ते यूजर्स क्रोम आणि गुगल अॅपवर अॅक्सेस करू शकणार आहेत. मात्र गुगलवर पूर्वीसारखे सर्च करणे सुरूच राहणार आहे. सर्च जनरेटिव्ह एक्सपीरिअन्स (SGE), ज्याला आधीच काही ठिकाणी वापरकर्त्यांसाठी लॉन्च केले गेले आहे. ते येथे भारतात इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये उपलब्ध असणार आहे. देशातील ज्या राज्यात हिंदी भाषेचा वापर आहे तिथे यूजर्स या दोन्ही भाषांमध्ये एकाच वापर करू शकतील. भारताच्या अन्य भागामध्ये केवळ इंग्रजीचाच वापर केला जाईल. तसेच कंपनी टेक्स्ट-टू-स्पीच हा पर्याय देखील यामध्ये जोडणार आहे. तसेच लवकरच व्हॉइस सर्च फिचर देखील यात जोडले जाईल.
या संदर्भात गुगल सर्चचे जनरल मॅनेजर पुनेश कुमार म्हणाले. या फीचरमुळे विशेषतः नवीन इंटरनेट यूजर्सना मदत मिळेल. जे सहसा ऑनलाईन माहितीच्या साठ्यामुळे त्याचा वापर अगदी सहज करू शकतात.
हे वैशिष्ट्य कसे वापराल?
- ही सेवा सर्वात आधी सर्च लॅबद्वारे अॅक्टिव्ह करावी लागेल. खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
- सर्वात आधी Google.com वर जा.
- स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला सर्च लॅब चिन्ह शोधा.
- त्यानंतर त्यावर क्लिक करा. यानंतर SGE, जनरेटिव्ह AI in Search संबंधी एक पॉप-अप दिसेल.
- त्याच्या शेजारी दिलेले टॉगल बटण चालू करा.
हे कसे मदत करेल?
या नवीन वैशिष्ट्यासह, यूजर्स आपला सर्चिंग अनुभव सुधारण्यास सक्षम असतील. भारतातील यूजर्स इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये सहजपणे स्विच करू शकतील. या अंतर्गत, तुम्ही ऑडिओ स्वरूपात देखील ऐकू शकता. Google Search हे जगातील अग्रगण्य सर्च इंजिनपैकी एक आहे, ज्याचा वापर जगभरातील लोक विविध प्रकारची माहिती, वेबसाईट, फोटो, व्हिडीओ, बातम्या आणि इतर कंटेंट शोधण्यासाठी करतात. Google चे AI सर्च टूल आता भारतीय आणि जपानी यूजर्सना एक चांगला अनुभव देईल.
महत्त्वाच्या बातम्या :