iPhone : आयफोन 13 आणि 14 च्या खरेदीवर होईल हजारो रुपयांची बचत जाणून घ्या दमदार आॅफर
फ्लिपकार्टवर आयफोनच्या वेगवेगळ्या मॉडेल्सवर भन्नाट ऑफर आणि डिस्काऊंट देण्यात येत आहे. आज शेवटचा दिवस लगेच करा खरेदी.
iPhone Discount and Offer : आयफोन खरेदी करण प्रत्येकाच स्वप्न असत. मात्र जास्त किंमतीमुळे बऱ्याचदा लोक आयफोन खरेदी करत नाहीत. आयफोन लव्हर्सकरता फ्लिपकार्ट घेऊन आले आहे मोठा सेल. या सेलमध्ये तुम्ही आयफोन 13 आणि 14 कमी किंमतीत खरेदी करू शकता. तसेच Apple ची नवीन सिरीज आयफोन 15 लवकरच बाजारात येत आहे. काही मोजक्या बँकेच्या कार्ड्सवरून तुम्हाला मोठी सवलत देखील मिळू शकते. ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर काही सेकंड हॅन्ड iPhone वर 11,401 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.आज या सेलचा शेवटचा दिवस आहे.
आयफोन 13 किंमत
फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये तुम्ही आयफोन 13 58,499 रुपयांना खरेदी करू शकता. तुम्ही हे Axis Bank कार्डने विकत घेतल्यास, तुम्हाला 1000 रुपयापर्यंत सूट मिळू शकते. त्यामुळे हा फोन तुम्ही 57,499 रुपयांना खरेदी करू शकता. तुम्ही APPLE iPhone 13 (Midnight, 256 GB) केवळ 68,499 मध्ये खरेदी करू शकता. त्याची खरी किंमत 79,900 रुपये आहे. त्याचप्रमाणे, तुम्ही APPLE iPhone 13 (Green, 512 GB) 88,499 रुपयांना खरेदी करू शकता, तर त्याची बाजारातील किंमत 99,900 रुपये आहे.
आयफोन 14 किंमत
Flipkart iPhone 14 वरही उत्तम ऑफर देत आहे. तुम्ही APPLE iPhone 14 (Purple, 128 GB) 68,999 च्या किमतीत खरेदी करू शकता, ज्याची खरी किंमत 79,900 आहे. त्याचप्रमाणे iPhone 14 Plus (Purple, 128 GB) ची सेलमधील किंमत सध्या 73,999 रुपये आहे, तर त्याची बाजारातील किंमत 89,900 रुपये आहे. तुम्ही iPhone 14 Pro 1,17,999 रुपयांना खरेदी करू शकता, तर त्याची खरी किंमत 1,29,900 रुपये आहे. तुम्ही APPLE iPhone 14 Pro Max (Silver, 128 GB) मॉडेल 1,27,999 रुपयांना खरेदी करू शकता, तर त्याची खरी किंमत 1,39,900 रुपये आहे. Apple iPhone ला चार्जर दिला जात नाही. आयफोन खरेदी केल्यानंतर, चार्जर घेण्यासाठी तुम्हाला वेगळा खर्च करावा लागेल. तुम्ही जुना iPhone iPhone 11 43,999 रुपयांना खरेदी करू शकता. याशिवाय आयफोनचे जुने मॉडेलही या सेलमध्ये कमी किमतीत दिले जात आहेत.
पुढील महिन्यात 'हा' स्मार्टफोन होणार लाँच
स्मार्टफोन मार्केटमध्ये आता कंपन्या फोल्डेबल फोनबाबत नवनवे प्रयोग करत आहेत. सॅमसंग, मोटोरोला, ओप्पो, गुगल आधीच त्यांचे स्वतःचे फोल्डेबल फोन ऑफर करत आहेत आणि आता चीनी कंपनी वनप्लस देखील आता मार्केटमध्ये पुढच्या महिन्यात आणणार आहे. या फोल्डेबल फोनमध्ये 3.36GHz Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आणि 16 GB रॅम असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Smartprix नुसार, OnePlus Open Foldable ची अधिकृत घोषणा 29 ऑगस्ट रोजी अपेक्षित आहे.