Dating Apps Fraud : डेटिंग अॅप्स वापरणाऱ्यांना सरकारने दिला सावधानतेचा इशारा; जाणून घ्या काय आहे प्रकरण
डेटिंग अॅप्स आणि मॅट्रिमोनियल साइट्स इत्यादी आॅनलाईन प्लॅटफाॅर्मवर स्कॅमर लोकांचे मोठे जाळे आहे. ते या जाळ्यात अनेक लोकांना अडकवतात.
66 टक्के लोक आजवर आॅनलाईन फ्राॅडचे बळी
डेटिंग अॅप्स आणि मॅट्रिमोनियल साइट्स इत्यादी आॅनलाईन प्लॅटफाॅर्मवर स्कॅमर लोकांचे मोठे जाळे आहे. ते या जाळ्यात अनेक लोकांना अडकवतात. एका रिपोर्टनुसार जवळपास 66% लोक या स्कॅमरच्या जाळ्यात अडकले आहेत. वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, वित्त मंत्रालयाने अलीकडेच मॅट्रिमोनिअल डेटिंग स्कॅम्सशी संबंधित एक अॅडव्हायझरी जारी केली आहे.
Beware of fraudsters extorting money in the name of Indian Customs!
— PIB India (@PIB_India) August 9, 2023
Indian Customs never calls or send SMS for paying Customs Duty in a personal bank account. All communication from Indian Customs contain a DIN which can be verified on CBIC website. #FraudAlert pic.twitter.com/ArNxQa88o8
मिळालेल्या माहितीनुसार, आता घोटाळेबाज एका वेगळ्या प्रकारच्या युक्तीने लोकांना त्यांच्या जाळ्यात अडकवत आहेत. ज्यामध्ये ते प्रथम लोकांना ऑनलाइन भेटतात आणि नंतर त्यांचे मित्र किंवा प्रियकर असल्याचे भासवून त्यांना भेटवस्तू पाठवण्यास सांगतात. त्यानंतर त्याला विमानतळावर कस्टम ड्युटी फी भरण्यास सांगितले जाते जेणेकरून त्याला भेटवस्तू मिळू शकेल. ही घटना खरी असल्याचे त्या व्यक्तीला वाटते आणि मागितलेली सर्व रक्कम विश्वास ठेऊन समोरचा व्यक्ती देतो. अर्थ मंत्रालयाने लोकांना अशा घोटाळ्यांबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे. तसेच अशा प्रकारे पैसे जमा करण्यासाठी विभागाकडून कोणत्याही व्यक्तीला संदेश किंवा खात्याचा तपशील पाठवला जात नाही, असेही सांगण्यात आले आहे.
भारतात Tinder, Bumble, Badoo, woo सारख्या अॅप्सची लोकप्रियता प्रचंड आहे. Tinder हे Dating App भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहे. या Dating सर्विसला वर्ष 2012 मध्ये सुरू करण्यात आले होते आणि हे 13 भाषांमध्ये उपलब्ध आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Assam Flood : आसाममध्ये 'जलप्रलय'! सुमारे 30 हजार लोकांना फटका, 175 गावं पाण्याखाली