'हे' चार स्मार्टफोन 25 मिनिटांपेक्षा कमी वेळेत होतात पूर्ण चार्ज, पाहा संपूर्ण लिस्ट
Fastest charging phones in 2023: आज आपण अशा 4 स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांची बॅटरी 25 मिनिटांत पूर्ण चार्ज होते.
Fastest charging phones in 2023: मोबाईल फोन ही आज आपल्या सर्वांची गरज बनली आहे. मोबाईल फोन तेव्हाच चांगला म्हणता येईल जेव्हा त्याची बॅटरी दिवसभर चालते आणि आपण आपली सर्व कामे न थांबता करू शकतो. चांगला स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी अनेकजण तासनतास इंटरनेटवर सर्च करत असतात आणि मग स्वतःसाठी सर्वोत्तम पर्याय निवडतात. स्मार्टफोन खरेदी करताना लोक त्याची बॅटरी किती mAh आहे आणि किती काळ टिकेल यावर विशेष लक्ष देतात. यातच आज आपण अशा 4 स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांची बॅटरी 25 मिनिटांत पूर्ण चार्ज होते.
Fastest charging phones in 2023: Xiaomi 13 pro
Xiaomi ने Xiaomi 13 pro मोबाईल अलीकडेच सादर केला. या स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा 2K OLED डिस्प्ले आहे, जो 120hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. मोबाइल फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8th जनरेशन 2 प्रोसेसरसह येतो. यात 4,820 mAh बॅटरी आहे. जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या मोबाईल फोनबाबत असा दावा करण्यात आला आहे की, हा केवळ 12 मिनिटांत पूर्ण चार्ज होतो.
Fastest charging phones in 2023: IQ00 11
IQ00 11 5G ला 5000 mAh बॅटरी मिळते. जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा मोबाईल फक्त 25 मिनिटांत पूर्ण चार्ज होतो. स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 120hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
Fastest charging phones in 2023: Redmi Note 12 Pro Plus
Redmi Note 12 Pro Plus मध्ये 4,980 mAh बॅटरी आहे, जी 120 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या स्मार्टफोनबद्दल कंपनीने दावा केला आहे की, हा केवळ 19 मिनिटांत पूर्ण चार्ज होतो. Redmi Note 12 Pro Plus 5G मध्ये ग्राहकांना 6.16-इंचाचा OLED डिस्प्ले मिळतो. जो 120 hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 200-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि कॉर्नर गोरिल्ला ग्लास 5 चे संरक्षण देण्यात आले आहे.
Fastest charging phones in 2023: Xiaomi 12 pro
Xiaomi 12 pro 5G मध्ये तुम्हाला 4600 mAh बॅटरी मिळते. जी 120 वॅट फास्ट चार्जरला सपोर्ट करते. हा मोबाइल फोन बूस्ट मोडमध्ये 18 मिनिटांत 100% चार्ज होतो, तर तो स्टँडर्ड मोडमध्ये 24 मिनिटे घेतो. स्मार्टफोनला 50W वायरलेस टर्बोचार्जिंग देखील मिळते, जे 42 मिनिटांत फोन पूर्णपणे चार्ज करते.
इतर महत्त्वाच्या बातम्या: