एक्स्प्लोर

ड्रायव्हर नाही, स्टिअरिंग नाही, आपोआप चालणार कार; एलॉन मस्क यांच्या टेस्लाने आणली अचंबित करणारी 'रोबोट टॅक्सी'

Tesla Newt Car : अब्जाधीश एलॉन मस्क यांच्या मालकीच्या टेस्ला या कंपनीने जगाला अचंबित करणारी कार आणली आहे. ही कार कोणत्याही ड्रायव्हरविना चालणार आहे.

कॅलिफोर्निया : जगभरात प्रसिद्ध असलेले अब्जाधीश एलॉन मस्क (Elon Musk) हे तंत्रज्ञानस्नेही आहेत. ते बाजारात नवनवी उत्पादने घेऊन येतात. मंगळ या उपग्रहावर मानवी वस्ती वसविण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यांची स्पेस एक्स ही कंपनी त्या दृष्टीने काम करत आहे. एलॉन मस्क यांची कारनिर्मिती क्षेत्रात काम करणारी टेस्ला ही कंपनीदेखील संपूर्ण जागाला अंचबित करणाऱ्या कारनिर्मितीत गुंतलेली असते. दरम्यान, मस्क यांच्या याच टेस्ला कंपनीने संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करणाऱ्या एका अनेख्या कारची निर्मिती केली आहे. या कारला सायबरकॅब असं नाव दिलं. 

सायबरकॅब आणि रोबोव्हॅनचे अनावरण

टेस्ला ही अमेरिकेतील ईव्ही कार निर्मिती करणारी दिग्गज कंपनी आहे. या कंपनीने नुकतेच सेल्फ ड्रायव्हिंग ड्रायव्हरलेस म्हणजेच कोणताडी चालक नसलेली कार सर्वांसमोर आणली आहे. या कारमध्ये कोणतेही स्टिअरिंग नाही. तसेच कोणत्याही ड्रायव्हरच्या मदतीविना ही कार रस्त्यावर धावू शकणार आहे. टेस्लाने या कारचे अनावरण कॅलिफोर्निया या शहरात केले आहे. ही एका प्रकारची रोबोट टॅक्सी आहे. सायबरकॅब या कारसह टेस्लाने एक रोबोव्हॅन नावाचे ईव्ही व्हॅनही लॉन्च केली आहे. 

रोव्होव्हॅनमध्ये नेमकं काय असणार?

टेस्लाने समोर आणलेली रोबोव्हॅन आणि सायबरकॅब ही कार बॅटरीवर चालते. या कारमध्ये अत्याधुनिक कृत्रिम बुद्धीमत्तेचा (आर्टिफिशियल इन्टेलिजन्स- AI ) वापर करण्यात आला आहे. याच एआयमुळे कार चालवताना ड्रायव्हरची गरज भासणार नाही. या कारमध्ये कोणतेही स्टिअरिंग हातात न घेता, आरामात बसता येणार आहे. तुम्ही आरामत बसून कारमध्ये कोणतेही काम करू शकता, तुम्ही दिलेल्या कमांडनुसार कार आपोआप चालणार आहे. 

30 हजार डॉलर्समध्ये कार खरेदी करता येणार?

या कारचे अनावरण करताना खुद्द एलॉन मस्क उपस्थित होते. विशेष म्हणजे या सायबरकॅबमध्ये चक्क एलॉन मस्क यांनी प्रवासही केला. कॅलिफोर्नियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सायबरकॅब आणि रोबोव्हॅनबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली नाही. मात्र अशा प्रकारच्या कार खरेदी करण्यासाठी जे उत्सूक आहेत ते 30 हजार डॉलर्समध्ये ही कार खरेदी करू शकता, असे एलॉन मस्क यांनी सांगितले आहे. 2027 पर्यंत या कारच्या उत्पादनाला सुरुवात होणार आहे. 

टेस्ला कंपनीतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार इलेक्ट्रिक रोबोव्हॅनमध्ये एका वेळी एकूण 20 लोक प्रवास करू शकतील. यासह या व्हॅनमधून सामानाचीही ने-आण करता येणार आहे. 

हेही वाचा :

Elon Musk: लाखाचे बारा हजार होणं म्हणतात ते हेच, X वर मोठं संकट, एलन मस्कचे पैसे बुडणं सुरुच,ट्विटर खरेदी अंगलट 

आँखों की गुस्ताख़ियाँ माफ़ हो... एलॉन मस्क आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या अफेयरची चर्चा? फोटो व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Guest Centre Dasara Melava : दसरा मेळाव्यात ठाकरेंचा रोख नेमका कुणावर असणार? ABP MajhaZero Hour Guest Centre Dilip Khristi | दसरा मेळाव्यात बहीण भावाची ताकद एकत्र येणार!Zero Hour | यंदाचा दसरा मेळावा कोण गाजवणार? कोण फुंकणार विधानसभेचं रणशिंग?Zero Hour Guest Centre Manoj Jarange | घरी बसून चालणार नाही, सगळ्यांनी एकजुटींनी नारायणगडावर या!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
Embed widget