Diwali Photo Hacks On i phone : दिवाळीत i Phone मध्ये क्रिएटिव्ह फोटो काढाण्यासाठी खास सेटींग्ज, ट्रिक्स आणि टिप्स नक्की फॉलो करा...
आपण काढलेले फोटो नीट यावे, यासाठी आपल्या फोनमध्ये काही सेटींग्ज कराव्या लागणार आहे. या सेटींग्ज केल्यानंतर तुम्हाही प्रोफेशनल फोटोग्राफर किंवा सेलिब्रिटीसारखे फोटो काढू शकणार आहात.
Diwali Photo Hacks On I-phone : दिवाळीचा सण काहीच दिवसांवर येऊन(Diwali Photo Hacks On I-phone) ठेपला आहे. त्यातच अनेक लोक सुंदर आणि क्रिएटिव्ह फोटो काढण्याकडे सर्वांचा कल असतो. मात्र आपले फोटो नीट येण्यासाठी किंवा क्रिएटीव्ह दिसण्यासाठी (Pohotography skills) अनेकजण प्रयत्न करत असतात. (I-phone camera Settings) मात्र तरीही अनेकांचे फोटो त्यांना हवे तसे कॅप्चर होत नाही. आपण काढलेले फोटो नीट यावे, यासाठी आपल्या फोनमध्ये काही सेटींग्ज कराव्या लागणार आहे. या सेटींग्ज केल्यानंतर तुम्हीदेखील प्रोफेशनल फोटोग्राफर किंवा सेलिब्रिटीसारखे फोटो काढू शकणार आहात. त्या सेटींग्ज आणि टिप्स नेमक्या कोणत्या आहेत पाहुयात...
चांगले फोटो काढण्यासाठी तुमच्या आयफोनमध्ये कोणत्या सेटींग्ज कराल?
-या दिवाळीमध्ये हटके फोटो काढण्यासाठी i-phone च्या वाइड लेन्सचा वापर करा.
-या सोबतच व्हिडिओ काढण्यासाठी तुमच्या आयफोनच्या कॅमेरा सेटींग्समध्ये PAL फॉरमॅटला अॅक्टिवेट करा .
-त्यासोबतच व्हिडीओ काढायचे असेल तर ते व्हिडीओ 25fps वरती शूट करा.
-व्हाईट बॅलन्स स्टेबल करुन घ्या.
- त्यानंतर व्हाईट बॅलन्स लॉक करा.
- रुल ऑफ थर्डचा वापर करा.
- कॅमेरा सेटींग्जमध्ये जाऊन ग्रिड लाईन ऑन करा.
- 4:3 च्या फॉरमॅटमध्ये फोटो काढा.
-रात्री घेतलेल्या फोटोमध्ये आपल्याला जास्त नॉइस असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे अंधारात फोटो न काढता पुरेसा लाईट असलेल्या ठिकाणी फोटो काढायला प्राधान्य द्या.
- दिवे आणि लाईटच्या माळांसोबत फोटो काढताना ब्राईटनेस कमी करुन फोटो काढा.
आयफोन वापरणाऱ्यांनी लेझर लाईटमध्ये फोटो काढणं टाळावं?
दिवाळीत प्रत्येक घरात रोषणाई केली जाते. ही रोषणाई टिपण्यासाठी अनेकजण आतरु असतात. याच रोषणाई किंंवा लाईटींगच्या माळांच्या तीव्र लाईटमुळे काही मोबाईलचे कॅमेरे खराब होऊ शकतात. अनेकदा कॅमेरा क्वालिटी खराब झाल्याचंही आपण पाहिलं आहे. मात्र आयफोनचा कॅमेरा घरात वापरण्यात आलेल्या लाईटच्या माळांमुळे खराब होत नाही. मात्र आयफोनचा कॅमेरा लेझर लाईटमुळे खराब होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. लेझर लाईटमुळे कॅमेऱ्यांच्या लेन्सवर परिणाम होतो त्यामुळे कॅमेरा लेन्स निकामी होतात किंवा त्यावर हिरव्या आणि निळ्या रंगाच्या रेषा दिसायला लागतात. त्यामुळेच आयफोन वापरणाऱ्यांनी लेझर लाईटमध्ये फोटो किंवा व्हिडीओ काढणं टाळावं.
इतर महत्वाची बातमी-
iPhone Hacking : एक सेकंदातही हॅक होऊ शकतो तुमचा आयफोन; 'अशी' चोरी होऊ शकते वैयक्तिक माहिती