एक्स्प्लोर

iPhone Hacking : एक सेकंदातही हॅक होऊ शकतो तुमचा आयफोन; 'अशी' चोरी होऊ शकते वैयक्तिक माहिती

iPhone Hack : विरोधकांचे आयफोन हॅक करण्याचा प्रयत्न होत असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर मोठा गदारोळ उडाला. त्यामुळे खरंच आयफोन हॅक केला जाऊ शकत नाही का, असा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे.

iPhone Hacking : सेफ्टी आणि फिचर्सबाबत आयफोन अतिशय सुरक्षित (i Phone Safety) आणि स्मार्टफोन समजला जातो. तर, दुसरीकडे सायबर हॅकर्सकडून (Cyber Hackers) विविध पद्धतीने फोन हॅक करण्याचे प्रयत्न केले जातात. आयफोन हॅक केला जाऊ शकत नाही, असा अनेकांचा दावा आहे. आज, विरोधकांचे आयफोन हॅक करण्याचा प्रयत्न होत असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर मोठा गदारोळ उडाला. त्यामुळे खरंच आयफोन हॅक केला जाऊ शकत नाही का, असा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. 

iPhone 13 Pro 1 सेकंदात झाला होता हॅक

गेल्या वर्षी, चीनमध्ये Tianfa Cup आंतरराष्ट्रीय नेटवर्क सुरक्षा स्पर्धेदरम्यान, एका हॅकरने iPhone 13 Pro हॅक करून दाखवला होता. Pangu Labs च्या हॅकरने आयफोन 13 प्रो अवघ्या 1 सेकंदात हॅक केला. हॅकिंगसाठी, वापरकर्त्याला फक्त एका लिंकवर क्लिक करावे लागेल. यानंतर हॅकरला iPhone 13 Pro च्या प्रत्येक माहितीचे ऍक्सेस मिळाले.

स्विच ऑफ केल्यानंतरही हॅकिंग

जर्मनीच्या युनिव्हर्सिटी ऑफ डार्मस्टॅडच्या संशोधकांना असे आढळून आले की, आयफोन बंद असतानाही तो हॅक केला जाऊ शकतो. त्यांच्या अभ्यासानुसार, आयफोन 12 किंवा आयफोन 13 किंवा इतर कोणताही आयफोन असो, ते मालवेअर आणि हॅकिंगद्वारे युजर्सच्या माहितीवर डल्ला मारला जाऊ शकतो. आयफोन बंद झाला तरीही हॅकिंग होतच राहते. आयफोनची काही फिचर्स हे स्विच ऑफ केल्यानंतरही सक्रिय राहतात.

वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते

आयफोनमधील ब्लूटूथ, नियर फील्ड कम्युनिकेशन (NFC) आणि अल्ट्रा-वाइडबँड (UWB) पॉवर बंद झाल्यानंतरही काम करत राहतात. हे फीचर्स आयफोन शोधण्यासाठी वापरली जातात म्हणजेच  Find My Device या फीचर्ससाठी हा पर्याय वापरला जातो.  हॅकर्स या तिन्ही फीचर्सच्या मदतीने तुमच्या आयफोनशी छेडछाड करू शकतात.

ब्लूटूथ चिपचे फर्मवेअर बदलून किंवा मालवेअर लोड करून आयफोन हॅक केला जाऊ शकतो, असे संशोधनातून समोर आले आहे. अशा प्रकारे तुमची माहिती चोरली जाऊ शकते. ही चूक सॉफ्टवेअरमध्ये नसून हार्डवेअरमध्ये आहे. सॉफ्टवेअर समस्या असल्यास, ती iOS अपडेटने निश्चित केली जाऊ शकते.

हॅकिंगशी संबंधित ही प्रकरणे एक-दोन वर्षे जुनी आहेत. दरम्यान, Apple ने अनेक iOS अपडेट्स जारी केले आहेत, ज्यामुळे आयफोनची सुरक्षा अधिक मजबूत करतात. त्यामुळे सध्याच्या आयफोनमध्ये हॅकिंग शक्य आहे की नाही हे अद्याप सांगता येणार नाही. विशेषतः, Apple ने नुकत्याच लाँच केलेल्या iPhone 15 सीरीजमधील फोन हॅक होण्याच्या शक्यतेबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 4th Test : ज्याची भीती होती तेच घडलं! कर्णधार रोहित शर्माचे नशीबच फुटकं, सलामीवीर म्हणून आला अन्...
ज्याची भीती होती तेच घडलं! कर्णधार रोहित शर्माचे नशीबच फुटकं, सलामीवीर म्हणून आला अन्...
Video : संसदेत टोकाची टीका, टोकाचा विरोध, पण मनमोहन सिंग यांचा असा 'शायराना' अंदाज ज्यानं नवा आदर्श घालून दिला!
Video : संसदेत टोकाची टीका, टोकाचा विरोध, पण मनमोहन सिंग यांचा असा 'शायराना' अंदाज ज्यानं नवा आदर्श घालून दिला!
Ind vs Aus 4th Test : मेलबर्नमध्ये चाहत्यांची घुसखोरी; कोहलीच्या गळ्यात टाकला हात अन्... मैदानात नेमकं काय घडलं? पाहा Video
मेलबर्नमध्ये चाहत्यांची घुसखोरी; कोहलीच्या गळ्यात टाकला हात अन्... मैदानात नेमकं काय घडलं? पाहा Video
Manmohan Singh : सोनं गहाण ठेवलं, टीका सहन केली पण भारताला संकटातून वाचवलं, मनमोहन सिंह यांच्याकडून आर्थिक सुधारणांची पायाभरणी 
कर्जाची परतफेड करण्यासाठीही परकीय चलन नव्हतं, मनमोहन सिंह यांनी सोनं गहाण ठेवण्याचा मार्ग स्वीकरला अन् चित्र बदललं   
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tuljapur Sarpanch Attack : कारवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, तुळजापुरात सरपंचावर जीवघेणा हल्लाTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :27 डिसेंबर 2024: ABP MajhaSambhajinagar News : बेरोजगार तरुणांची फसवणूक,  महाराष्ट्र कमांडो फोर्स जवान बनवण्याचं प्रलोभनManmohan Singh's Demise : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 4th Test : ज्याची भीती होती तेच घडलं! कर्णधार रोहित शर्माचे नशीबच फुटकं, सलामीवीर म्हणून आला अन्...
ज्याची भीती होती तेच घडलं! कर्णधार रोहित शर्माचे नशीबच फुटकं, सलामीवीर म्हणून आला अन्...
Video : संसदेत टोकाची टीका, टोकाचा विरोध, पण मनमोहन सिंग यांचा असा 'शायराना' अंदाज ज्यानं नवा आदर्श घालून दिला!
Video : संसदेत टोकाची टीका, टोकाचा विरोध, पण मनमोहन सिंग यांचा असा 'शायराना' अंदाज ज्यानं नवा आदर्श घालून दिला!
Ind vs Aus 4th Test : मेलबर्नमध्ये चाहत्यांची घुसखोरी; कोहलीच्या गळ्यात टाकला हात अन्... मैदानात नेमकं काय घडलं? पाहा Video
मेलबर्नमध्ये चाहत्यांची घुसखोरी; कोहलीच्या गळ्यात टाकला हात अन्... मैदानात नेमकं काय घडलं? पाहा Video
Manmohan Singh : सोनं गहाण ठेवलं, टीका सहन केली पण भारताला संकटातून वाचवलं, मनमोहन सिंह यांच्याकडून आर्थिक सुधारणांची पायाभरणी 
कर्जाची परतफेड करण्यासाठीही परकीय चलन नव्हतं, मनमोहन सिंह यांनी सोनं गहाण ठेवण्याचा मार्ग स्वीकरला अन् चित्र बदललं   
Numerology : 'या' जन्मतारखेच्या मुली वडिलांसाठी ठरतात लक्ष्मी, पतीच्या घरी होते धनसंपत्तीची भरभराट
'या' जन्मतारखेच्या मुली वडिलांसाठी ठरतात लक्ष्मी, पतीच्या घरी होते धनसंपत्तीची भरभराट
Dharashiv Crime: मस्साजोगनंतर आता तुळजापूरच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला, गुंडांकडून पेट्रोल टाकून गाडी जाळण्याचा प्रयत्न
मस्साजोगनंतर आता तुळजापूरच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला, गुंडांकडून पेट्रोल टाकून गाडी जाळण्याचा प्रयत्न
Ind vs Aus 4th Test : आधी स्मिथचे शतक, त्यानंतर जडेजाची कमाल! ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 474 धावांवर ऑलआऊट
आधी स्मिथचे शतक, त्यानंतर जडेजाची कमाल! ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 474 धावांवर ऑलआऊट
Health: रेडिमेड सँडविच खात असाल तर सावधान! एका कारखान्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर, आश्चर्यचकित व्हाल
रेडिमेड सँडविच खात असाल तर सावधान! एका कारखान्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर, आश्चर्यचकित व्हाल
Embed widget