Shein Re-launching In India : तीन वर्षांपूर्वी भारत सरकारने बंदी घातलेला चिनी कपड्यांचा Shein ब्रँड रिलाँच होणार!
जून 2020 मध्ये भारत सरकारने चीनी कपडयांच्या Shein ब्रँडसह 58 चीनी अॅपवर सुरक्षेच्या कारणामुळे बंदी घातली होती. परंतु, तीन वर्षाच्या बंदीनंतर भारतात पुन्हा एकदा हा ब्रँड रि-लाँच करण्यात येणार आहे.
Shein Re-launching in India : भारतात तीन वर्षांपर्यंत बंदी घातलेला प्रसिद्ध चिनी कपड्यांचा Shein ब्रँड रिलाँच करण्यात येणार आहे. या ब्रँडचे कपडे ट्रेंडी आणि युनिक स्टाईलमुळे आळखले जातात. विशेषत: महिला वर्गामध्ये या ब्रँडचे कपडे खूप प्रसिद्ध होते. ट्रेंडी आणि युनिक कपडे घालण्याची आवड असणाऱ्या महिलांना Shein ब्रँडबद्दल जास्त माहिती असेलच. जून 2020 मध्ये भारत सरकारने सुरक्षेच्या कारणामुळे Shein ब्रँडसह 58 चिनी अॅपवर सुरक्षेच्या कारणामुळे बंदी घातली होती. या बंदी घालण्यात आलेल्या अॅपमध्ये PUBG Mobile, TikTok आणि AliExpress इत्यादींचा समावेश होता. परंतु, आता रिलायन्स रिटेलसोबत पार्टनरशिप केल्यामुळे Shein ब्रँड भारतीय बाजारपेठांमध्ये पुन्हा दिसणार आहे.
रिलायन्ससोबत पार्टनरशिप?
भारतात 3 वर्षांपूर्वी Shein ब्रँडवर बंदी घालण्यात आली होती. आता Shein ब्रँड आणि रिलायन्स यांच्यात व्यावसायिक भागीदारी झाली आहे. त्यामुळे हा ब्रँड पुन्हा एकदा भारतात दिसणार आहे. मात्र, याविषयी रिलायन्सतर्फे अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, मीडिया रिपोर्टनुसार, या दोन्ही कंपन्यांमध्ये व्यावसायिक भागीदारी झाली आहे. त्यामुळे Shein ब्रँड भारतात रिलाँच करण्यात येणार आहे. या ब्रँडवर बंदी घातल्यानंतर काही महिन्यापर्यंत या ब्रँडचे कपडे ई-कॉमर्सच्या प्लॅटफॉर्मवरुन विक्रीसाठी उपलब्ध होते. मात्र, या प्लॅटफॉर्मवरुनही Shein ब्रँडला हटवण्यात आलं होतं. परंतु, हा प्रसिद्ध चिनी ब्रँड पुन्हा एकदा भारतात दिसणार आहे. कंपनी भारतात व्यवसाय करण्यासाठी रिलायन्स रिटेलच्या संसाधनाचा वापर करुन Shein ब्रँडची उत्पादने विकणार आहे.
2008 मध्ये Shein ब्रँडची सुरुवात झाली होती. सुरुवातीला या ब्रँडचे कपडे स्वस्त किमत आणि ट्रेंडी कपड्यांमुळे खूप लोकप्रिय झाले होते. यानंतर कंपनीने जागतिक मार्केटमध्ये हजारो कोटींचा व्यवसाय केला. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, जून 2021 मध्ये Shein ब्रँडची 60 टक्क्यांपर्यंत विक्री वाढली आणि कंपनीने जगभरात 16 बिलियन डॉलरपर्यंत व्यवसाय केला.
भारतात पुन्हा एकदा BGMI गेमिंग अॅप लाँच
सिक्युरिटी आणि प्रायव्हसीच्या कारणामुळे बॅटल ग्राऊंड्स मोबाईल इंडियावर (BGMI) जुलै 2022 मध्ये बंदी घालण्यात आली होती. परंतु, आता BGMI खेळणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. या अॅपवरील बंदी उठवण्यात आली आहे. पण या अॅपमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता BGMI प्ले स्टोवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही BGMI च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.