आता WhatsApp वर येणाऱ्या मेसेजला उत्तर ChatGPT देईल, कसं ते जाणून घ्या
ChatGPT : आता तुम्ही ओपन एआयचा चॅटबॉट 'चॅट जीपीटी'चा वापर करून व्हॉट्सअॅपवरील लोकांना ऑटो रिप्लाय करू शकता.
ChatGPT : जर तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत असाल तर अशी परिस्थिती तुमच्यावर अनेकवेळा आली असेल की तुम्ही थकलेले असाल आणि येणाऱ्या अनेक मेसेजला रिप्लाय द्यायला तुम्हाला जमत नसेल. अनेक मेसेज आल्यानंतर त्या व्यक्तीला असं वाटतं, रिप्लाय द्यायला हवा. मग तो थकलेला असतानाही आलेल्या मेसेजला रिप्लाय देतो. मात्र आता तुम्हाला हे सर्व करण्याची गरज नाही. कारण तुम्हाला कोणत्याही मेसेजला रिप्लाय द्यायला जमत नसेल , तर तुमच्यासाठी हे काम ChatGPT करू शकतो. होय ओपन एआयचा चॅटबॉट 'चॅट जीपीटी' तुमच्या वतीने व्हॉट्सअॅपवरील लोकांना रिप्लाय देईल. WhatsApp तुम्हाला ही सुविधा देत नाही. तुम्ही Github द्वारे ChatGPT ला WhatsApp सह इंटिग्रेट करू शकता. सोप्या भाषेत समजून घ्या की तुम्ही Github च्या माध्यमातून व्हॉट्सअॅपमध्ये चॅटबॉटचा वापर कसं करू शकता.
असं करू शकता हे काम
डॅनियल ग्रॉस या सॉफ्टवेअर डेव्हलपरने पायथन स्क्रिप्ट (कोडिंग नोट) तयार केली आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही चॅट जीपीटी व्हॉट्सअॅपसह इंटिग्रेट करू शकता. हे करण्यासाठी तुम्ही सर्वातआधी वेबवरून सर्व आवश्यक लँग्वेज फाइल्स डाउनलोड करा. सर्व फाईल्स डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला "WhatsApp-GPT-main" फोल्डर उघडावे लागेल आणि "server.py" डॉक्युमेंट Execute करावे लागेल. येथून व्हॉट्सअॅपसह चॅट जीपीटीचे इंडिग्रेशनसुरू होईल. सर्व्हर चालू असताना तुम्हाला IS टाइप करावे लागेल आणि एंटर दाबा, नंतर "python server.py" वर क्लिक करा. असे केल्याने तुमचा फोन नंबर Open AI च्या चॅट पेजवर रजिस्टर होईल. मग तुम्हाला कन्फर्म करावे लागेल. असं केल्यानंतर तुम्हाला GPT WhatsApp वर Open AI चे चॅट दिसेल.
जे लोक आपल्या कामात खूप व्यस्त असतात आणि ज्यांना WhatsApp वर येणाऱ्या मेसेजला रिप्लाय करण्यास कंटाळा येतो, ते ही पद्धत वापरून पाहू शकतात. हा चॅटबॉट अशा प्रकारे रिप्लाय करतो की, समोरच्या व्यक्तीला तुम्ही मेसेजला रिप्लाय केला आहे की कोणी दुसऱ्याने हे समजणार नाही. दरम्यान, इंटरनेटवर चॅट जीपीटीच्या नावाने अनेक प्रकारचे अॅप्लिकेशन्स, सॉफ्टवेअर, लिंक्स इत्यादी उपलब्ध आहेत. हे डाउनलोड करण्यापूर्वी सर्व तपशील तपासा.
टीप: ही बातमी फक्त सामान्य माहितीसाठी आहे. आम्ही इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या कोणत्याही लिंक किंवा सॉफ्टवेअरचा प्रचार करत नाही. अशा गोष्टींचा उपयोग करण्यापूर्वी कृपया सर्व तपशील तपासा.