BuzzFeed आता क्विज आणि कंटेंट तयार करण्यासाठी करणार चाटजीपीटीचा वापर
BuzzFeed : ऑनलाइन मीडिया कंपनी BuzzFeed आपला कंटेंट तयार करण्यासाठी OpenAI च्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) ChatGPT याचा वापर करण्याची शक्यता आहे.
BuzzFeed : ऑनलाइन मीडिया कंपनी BuzzFeed आपला कंटेंट तयार करण्यासाठी OpenAI च्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) ChatGPT याचा वापर करण्याची शक्यता आहे. यावर बजफीडने विचार सुरु केलाय. यासदंर्भात बोलताना बजफीडचे सीईओ जॉन पेरेटी ( CEO Jonah Peretti ) म्हणाले की, ChatGPT कंपनीच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावेल. महत्वाचं म्हणजे, पर्सनलिटी क्विज तयार करण्यासाठी कंपनी नवीन तंत्रज्ञानाचा विचार करत आहे. त्यासाठी नव्या योजनेवर काम करण्यात येत आहे. ChatGPT हे युजर्सनी विचारलेले प्रश्न आणि त्यांच्या प्रतिसादावर मजकूर अथवा टेक्स्ट तयार करते.
पेरेटी म्हणाले, 'आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) तंत्रज्ञानामुळे कंटेंट वाढवण्यासाठी मदत होईल... स्पष्टच सांगायचं झालं तर 'एआय'मुळे सर्जनशीलतेच्या नव्या युगाला सुरुवात होईल. तसेच आपल्या कल्पकतेला आणखी धुमारी फुटेल. एआयमुळे मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होईल तसेच नवीन मार्गांनी सर्जनशीलतेचा उपयोग करण्यास मदत होईल.' यावर्षी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) च्या माध्यमातून संशोधन आणि डेव्हलपमेंट स्टेज हा आमच्या मुख्य व्यावसायाचा भाग होईल. याचा वापर नवीन क्वीज (प्रश्नमंजुषा) तयार करण्यासाठी, कर्मचाऱ्यांना विचारमंथन करण्यासाठी आणि BuzzFeed च्या प्रेक्षकांसाठी कंटेट वैयक्तिकृत करण्यासाठी वापरली जाईल, असेही पेरेटी म्हणाले.
आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) तंत्रज्ञानामुळे व्यावसायात मोठ्या प्रमाणात फायदा होईल अन् मोठ्या प्रमाणात नफा मिळाले, असा बजफीडला विश्वास वाटतोय. गेल्या काही दिवसांपासून बजफीड मार्केटमध्ये संघर्ष करत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बजफीडच्या स्टॉकमध्ये 40 टक्केंनी घसरण झाली आहे. वर्षाच्या अखेरच्या तिमाहित बजफीडला 27 मिलियन डॉलरचा फटका बसला होता. दरम्यान, बजफीडचे सेलमध्ये 15 टक्केंनी वाढ पाहायला मिळाली. दरम्यान, ChatGPTचा वापर शिक्षण, कला,कायदा वगैरे क्षेत्रात तर होऊच शकतो, पण त्याचबरोबर कोडिंगच्या आणि मीडिया क्षेत्रात याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. OpenAI हे अजून बिटा मोडवर आहे त्यामुळे येणाऱ्या काळात यात मोठे बदल अपेक्षित आहेत.
काय आहे ChatGPT?
चॅटजीपीटी ही अगदी गूगलची सुधारित आवृत्ती असल्याचेही अनेकांनी म्हटले आहे. पण हे गुगलच्या पुढे जाऊन इंटरनेटवर उपलब्ध असलेला मजकूर आणि साहित्य वाचून आणि मुख्य म्हणजे तो मजकूर समजून घेऊन तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतं, तेही अगदी एखाद्या विचारवंतासारखं. चॅटजीपीटीचा सर्वात उत्तम फायदा म्हणजे तुम्ही आधीच्या प्रश्नाच्या उत्तरावरसुद्धा आधारित प्रश्न करू शकता. हे बॉट तुम्ही भूतकाळात विचारलेले प्रश्न लक्षात ठेवतं आणि जर तुम्ही एखादी त्याने एखादी केलेली चूक दाखवली तर त्यामध्ये स्वतः सुधार करतं. माणूस कल्पनेच्या जोरावर ज्या क्रिएटिव्ह गोष्टी करतो तेसुद्धा हा बॉट करतो.