एक्स्प्लोर

Apple iOS 17.4 Updates : Apple कडूून iOS 17.4 चं नवीन अपडेट; नवीन फीचर्सची लिस्ट पाहिलीत का?

Apple iOS 17.4 Updates : Apple ने आपल्या नवीन अपडेटमध्ये युरोपीयन यूजर्ससाठी काही अतिरिक्त बदल केले आहेत. तर, बाकीचे बदल तसेच नवीन फीचर्स हे आयफोनच्या सर्व यूजर्ससाठी करण्यात आले आहेत.  

Apple iOS 17.4 Updates : ऍपल (Apple) यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीने आपल्या पात्र iPhone आणि iPad मध्ये iOS 17.4 आणि iPadOS 17.4 रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे. Apple च्या या नवीन ऑपरेटिंग सिस्टीममध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. जसे की, iPhone वर पर्यायी ऍप मार्केटची सुरुवात, बँका आणि पेमेंट प्रोवाडर्ससाठी NFC ऍक्सेस करण्यात आले आहेत. 

खरंतर, हे बदल फक्त EU म्हणजेच युरोपियन यूजर्ससाठी लागू करण्यात आले आहेत. Apple ने आपल्या नवीन अपडेटमध्ये युरोपीयन यूजर्ससाठी काही अतिरिक्त बदल केले आहेत. तर, बाकीचे बदल तसेच नवीन फीचर्स हे आयफोनच्या सर्व यूजर्ससाठी करण्यात आले आहेत.  

Apple डिव्हाईसमध्ये नवीन इमोजीचा समावेश 

नवीनतम अपडेटसह, Apple ने नवीन मशरूम, लिंबू, फिनिक्स, तुटलेली साखळी आणि शेकिंग हँड इमोजी आपल्या सॉफ्टवेअरमध्ये जोडले आहेत. ज्याचा वापर iPhone किंवा iPad यूजर्सना आपला फोन अपडेट केल्यानंतर वापरू शकतात. याशिवाय, नवीन अपडेटनंतर, आयफोन 15 सीरिज यूजर्स बॅटरी सायकल काऊंट, मॅन्युफॅक्चर डेट आणि बॅटरी हेल्थ सेक्शनमध्ये अनेक नवीन फीचर्सचा वापर करू शकतील. 

स्टोल डिव्हाईस प्रोटेक्शन 

याशिवाय Apple ने स्टोल डिव्हाईस प्रोटेक्शन अंतर्गत एक नवीन पर्याय जोडला आहे. हे नवीन फीचर सर्व ठिकाणी डिव्हाईसची सुरक्षा वाढविण्याचे काम करतात. जर तुमचे डिव्हाईस चोरीला गेले आणि नवीन ठिकाणी वापरले असल्यास, स्टोलन डिव्हाईस प्रोटेक्शनचं हे नवीन फीचर कोणतीही माहिती जसे की, अॅपल आयडी, पासवर्ड यांसारखी महत्त्वाची माहिती बदलण्यापासून किंवा त्याचा एक्सेस करण्यापासून प्रतिबंधित करेल.

नवीन अपडेटमध्ये मिळणार ट्रान्सक्रिप्ट फीचर 

या नवीन अपडेटमध्ये एक नवीन ट्रान्सक्रिप्शन फीचर देखील जोडण्यात आलं आहे. हे फीचर यूजर्सना  इंग्लिश, जर्मन, फ्रेंच आणि स्पॅनिश भाषेत ऑडिओसह सिंक केलेल्या टेक्स्टसह पॉडकास्ट ऐकण्याची संधी देते. या मजकूराच्या भागात तुम्ही टेक्स्टला पूर्णपणे वाचू शकता. कोणत्याही एका शब्द किंवा वाक्य शोधता येते.तसेच, विशिष्ट ठिकाणाहून पॉडकास्ट प्ले करण्यासाठी टेक्स्टला टॅप केला जाऊ शकतो.

याशिवाय यूजर्स टेक्स्ट साईज वाढवणे, कॉन्ट्रास्ट आणि व्हॉईस ओव्हर यांसारख्या वैशिष्ट्यांचाही लाभ घेऊ शकतात. याशिवाय ॲपल असिस्टंट सिरीमध्ये अनेक नवीन क्षमतांचा समावेश करण्यात आला आहे. आता सिरी कोणत्याही समर्थित भाषेत इनकमिंग कॉल्सची घोषणा करू शकते.

काही नवीन फीचर्स जोडण्याव्यतिरिक्त, Apple ने आपल्या नवीन अपडेट्ससह काही जुने फीचर्स देखील अपडेट केले आहेत. याशिवाय काही खास फीचर्स आहेत जे फक्त युरोपियन यूजर्ससाठी सादर करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

Boult Z40 Ultra : प्रीमियम डिझाईन आणि AI फीचर; 100 तास नॉन-स्टॉप प्ले करणारे 'हे' इयरबड्स तुम्ही पाहिलेत का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Embed widget