Apple ने iOS 16.4 अपडेट केलं रिलीज, मिळणार हे जबरदस्त फीचर्स
Apple releases iOS 16.4: अॅपलने आयफोनबाबत एक मोठा बदल केला आहे. कंपनीने iPhone साठी iOS 16.4 अपडेट जारी केला आहे.
Apple releases iOS 16.4: अॅपलने आयफोनबाबत एक मोठा बदल केला आहे. कंपनीने iPhone साठी iOS 16.4 अपडेट जारी केला आहे. या अपडेटमध्येही अनेक बदल करण्यात आले आहेत. हा अपडेट iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि 14 Pro Max मध्ये क्रॅश डिटेक्शन ऑप्टिमाइझ करते. यासह अपडेटनंतर युजर्सचा फोन वापरण्याचा अनुभव आणखी चांगला होणार आहे.
Apple releases iOS 16.4: 21 नवीन इमोजी
Apple ने iOS 16 स्टेबल करण्यासाठी हे अपडेट जारी केले आहे. या अपडेटमध्ये तुम्हाला 21 नवीन इमोजी मिळतील. हे कीबोर्डद्वारे सहज प्रवेश करता येतात. यासह, नवीन अपडेटनंतर, आपण होम स्क्रीनवर सहजपणे वेब अॅप सूचना जोडण्यास सक्षम असाल. या अपडेटसह व्हॉइस आयसोलेशन सुरू करून, तुम्ही कॉलची गुणवत्ता सुधारण्यास देखील सक्षम व्हाल.
यासोबतच आयफोन आता iCloud वर शेअर केलेल्या फोटो लायब्ररीवर डुप्लिकेट फोटो आणि व्हिडीओ देखील शोधू शकतो. याशिवाय आता मॅपसाठी व्हॉईस ओव्हर सपोर्टही उपलब्ध होणार आहे. तसेच अॅपल युजर्स आता व्हिडीओ दरम्यान फ्लॅश किंवा लाईट चालू असताना ते डिम करू शकतील. iOS 16.4 अपडेट अॅपल बुक्सवर पेज-टर्न अॅनिमेशन पुन्हा सादर करते. वाचक आता सध्याच्या "स्लाइड" पर्यायासह जुन्या "कर्ल" अॅनिमेशनचा आनंद घेऊ शकतात.
Apple releases iOS 16.4: अधिक फास्ट 5G
iOS 16.4 अपडेटसह Apple ने iPhones वर 5G SA (स्टँडअलोन) नेटवर्क सक्षम करण्याचा पर्याय जोडला आहे. हे फीचर्स अमेरिका, जपान आणि ब्राझीलमधील आयफोन युजर्ससाठी उपलब्ध आहे. हे फीचर फक्त iPhone 12 आणि त्याच्या नंतर आलेल्या मॉडेलवरच काम करेल.
Apple releases iOS 16.4: असं डाउनलोड करा iOS 16.4 अपडेट
iOS 16.4 अपडेट डाउनलोड आणि इन्स्टॉल करणं अगदी सोपं आहे. आयफोनवर नवीन iOS अपडेट डाउनलोड आणि इन्स्टॉल करण्यासाठी या या स्टेप फॉलो करा..
- आयफोनच्या सेटिंग्जवर जा.
- आता General वर टॅप करा.
- त्यानंतर Software Update वर जा.
- येथून ऑटोमॅटिक अपडेटड अॅक्टिव्ह करा.
- आता iOS 16.4 अपडेटसाठी Install Now वर क्लिक करा.
लक्षात ठेवा की अपडेट करताना, तुमचा iPhone Wi-Fi नेटवर्क किंवा 5G नेटवर्कशी कनेक्ट केलेला असावा. ज्याने हा अपडेटड लवकर डाउनलोड होईल. याशिवाय हे देखील लक्षात ठेवा की सॉफ्टवेअर अपडेट सुरू करण्यापूर्वी, आयफोनमध्ये किमान 50 टक्के बॅटरी आहे का, हे तपासा.