(Source: Poll of Polls)
Apple Event 2023: Apple Smartwatch Series 9 मध्ये पहिल्यांदाच डबल टॅप फीचर उपलब्ध, जाणून घ्या किंमत
मंगळवारी पार पडलेल्या Apple च्या Wonder lust या कार्यक्रमात, कंपनीने सर्वप्रथम स्मार्टवॉच सीरीज 9 चे अनावरण केले. तुम्ही ही सीरीज 4 रंगांमध्ये खरेदी करू शकाल. जाणून घ्या सविस्तर
Apple Watch Series 9 Launched : मंगळवारी Apple Smartwatch Series 9 लाँच करण्यात आले आहे. कंपनीने या सीरिजमध्ये S9 चिप वापरली आहे जी सीरीज 8 पेक्षा अॅडव्हान्स आहे. Smartwatch Series 9 मध्ये पहिल्यांदाच डबल टॅप फीचर उपलब्ध करून देण्यात आले आहे, जाणून घ्या सविस्तर
स्मार्टवॉच सीरीज 9 मध्ये डबल टॅप फीचर
नवीन सीरिजमध्ये कंपनीने डबल टॅप फीचर दिले आहे ज्याच्या मदतीने तुम्ही कॉल एंड करू शकता किंवा उचलू शकता. डबल टॅपसाठी तुम्हाला दोन बोटांनी स्पर्श करावा लागेल. Apple स्मार्टवॉच सीरीज 9 तुम्ही स्टारलाईट, सिल्व्हर, मिडनाईट आणि रेड रंगांमध्ये खरेदी करू शकाल. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही Apple स्मार्टवॉच सीरीज $399 आणि $499 मध्ये खरेदी करू शकाल.
स्पेसिफिकेशन्स
स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर, स्मार्टवॉच सीरीज 9 मध्ये तुम्हाला 18 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप आणि 2 डिस्प्ले साईझ मिळतात. तुम्ही ही सीरीज स्टारलाइट, सिल्व्हर, मिडनाईट आणि नवीन गुलाबी अॅल्युमिनियम केसमध्ये खरेदी करू शकता तर, स्टेनलेस स्टील, व्हेरिएंट गोल्ड, सिल्व्हर आणि ग्रेफाइट फिनिशसह येतो. याशिवाय स्मार्टवॉच सीरीज 9 नेमेड्रॉपलाही सपोर्ट करते. ही सुविधा iOS 17 च्या iPhones मध्ये देखील उपलब्ध आहे. घड्याळाला एक नवीन अल्ट्रा-वाइडबँड चिप मिळते, जे प्लेलिस्ट त्वरित सक्रिय करते. याशिवाय, Apple उपकरणे शोधणे देखील सोपे होते.
Apple Watch Ultra 2 चे स्पेसिफिकेशन आणि किंमत
कंपनीने Apple Watch Ultra 2 देखील लॉन्च केला आहे. यात 3,000nits डिस्प्ले आहे. आणि हा एक नवीन मॉड्यूलर अल्ट्रा वॉच फेससह येतो. ज्याला तुम्ही कस्टमाईझ करू शकता. स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला S9 चिप, अपग्रेडेड अल्ट्रा वाइडबँड चिप आणि डबल टॅप सपोर्ट देखील मिळतो. त्याची किंमत 799 डॉलर (66,194 रुपये) आहे. स्मार्टवॉचचा बॅटरी बॅकअपही चांगला आहे. हे एका चार्जवर 72 तास स्टँडबाय मोडमध्ये आणि 36 तास सामान्य चार्जमध्ये सुरू राहू शकते.
प्री-ऑर्डर कधीपासून?
दोन्ही स्मार्टवॉचसाठी प्री-ऑर्डर 15 सप्टेंबरपासून सुरू होतील तर पहिली अधिकृत विक्री 22 सप्टेंबरला होईल. तर भारतात, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max 22 सप्टेंबरपासून उपलब्ध होतील. तुम्ही अॅपल स्टोअरला जाऊन हे फोन तसेच स्मार्टवॉच बुक करू शकता. इतर शहरातील लोक Apple च्या अधिकृत साइटला भेट देऊन iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max फोन, Apple Smartwatch Series 9 बुक करू शकतात.
संबंधित बातम्या