Apple Glowtime Event: Apple ची मोठी घोषणा; भारतात 9 सप्टेंबरला लॉन्च होणार iPhone 16 सीरीज
Apple आयफोन 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro, iPhone 16 Pro Max भारतात आणि जागतिक बाजारपेठेत लॉन्च करणार आहे.
Apple Glowtime Event: Apple नं आपल्या सप्टेंबर इव्हेंटची (Apple Launch Event) लॉन्च तारीख जाहीर केली आहे. ज्यामध्ये Apple iPhone 16 सीरिज लॉन्च केली जाईल. हा स्मार्टफोन 9 सप्टेंबर रोजी भारतात आणि जागतिक बाजारात लॉन्च केला जाईल, हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता होईल. हा कार्यक्रम कॅलिफोर्नियातील Apple Park मध्ये पार पडणार आहे.
Apple आयफोन 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro, iPhone 16 Pro Max भारतात आणि जागतिक बाजारपेठेत लॉन्च करणार आहे. याशिवाय Watch Series 10, Watch Ultra 3, Watch SE 3, AirPods Max 2 आणि AirPods 4 देखील नॉक करू शकतात.
घरबसल्या पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग
ॲपल कंपनी या कार्यक्रमाचं लाईव्ह स्ट्रीमिंग केलं जाणार आहे. हा कार्यक्रम अधिकृत वेबसाईट, अॅपल टीव्ही आणि यूट्यूब इत्यादींवर थेट लाईव्ह दाखवला जाणार आहे. यासाठी तुम्ही अधिकृत चॅनेलला भेट देऊ शकता आणि Notify Me बटणावर क्लिक करू शकता. यानंतर, जेव्हाही थेट प्रक्षेपण सुरू होईल, तेव्हा तुम्हाला एक अलर्ट मिळेल.
It is Glowtime टॅगलाईन
Apple नं या इव्हेंटसाठी It is Glowtime ही टॅगलाइन वापरली आहे. ज्यामुळे या इव्हेंटबद्दल अधिक तपशील उपलब्ध नाहीत. मीडिया रिपोर्ट्समध्ये यापूर्वीही अनेकदा दावा करण्यात आला आहे की, यावेळी AI संदर्भात अनेक नव्या गोष्टी नव्या सीरिजमध्ये पाहायला मिळतील. याशिवाय iPhone 16 सीरीजमधील कॅमेरा सेटअपमध्येही बदल दिसून येतील.
आयफोन 16 सीरिजची किंमत वाढू शकते
Apple iPhone 16 सीरीजचे मॉडेल जुन्या मॉडेल्सपेक्षा थोडं अधिक महाग असू शकते, असं सांगितलं जात आहे. त्यामागील कारण म्हणजे, उत्पादन खर्च असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या वर्षी iPhone 15 ची सुरुवातीची किंमत 79 हजार 900 रुपये ठेवण्यात आली होती, तर यावेळी iPhone 16 ची किंमत यापेक्षा थोडी जास्त असू शकते, असं सांगितलं जात आहे.
आयफोनची किंमत वाढू शकते
मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, यावेळी किंमत 10 हजार रुपयांनी वाढली आहे. मात्र, सर्व मॉडेल्सच्या किंमतींबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. कंपनीकडून किंमतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.