एक्स्प्लोर
युवीच्या शतकानंतर वडील योगराज म्हणाले...

कटक : तीन वर्षांनंतर भारताच्या वन डे क्रिकेट संघात पुनरागमन करणाऱ्यां युवराज सिंहने, त्याच्या दुसऱ्याच सामन्यात शतक ठोकून चाहत्यांना मोठी भेट दिली. युवराजने केवळ 98 चेंडूत शतक पूर्ण केलं. या तुफानी खेळीत युवीने 21 चौकार आणि 3 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने 150 धावा ठोकल्या. सहा वर्षांनी युवराज सिंहचं शतक युवराजच्या या शतकी खेळीमुळे त्याचे वडील योगराज सिंह फारच खूश आहे. योगराज म्हणाले की, "युवीकडे 200 धावा करण्याची संधी होती. तो अतिशय चांगला खेळला आणि येणारा काळ युवराजचा आहे." युवीने कॅन्सरला हरवलं होतं, आज फक्त इंग्लंडला हरवलं : सेहवाग "युवराजचा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. यापुढेही तो उत्तम कामगिरी करेल. युवराजमध्ये अजूनही क्रिकेट शिल्लक आहे," असंही योगराज सिंह म्हणाले. इंग्लंडविरुद्ध शतक ठोकल्यानंतर युवी म्हणतो की... वन डे क्रिकेट कारकीर्दीतील युवराजचं हे 15वं शतक आहे. युवराज सिंहने महेंद्र सिंह धोनीसोबत चौथ्या विकेटसाठी 256 धावांची भागीदारी रचली. धोनीनेही या सामन्यात 134 धावांची खेळी केली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























