एक्स्प्लोर
ट्रिपल एचने मुंबई इंडियन्सला दिलेला शब्द पाळला!
वर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेंट अर्थात WWE सुपरस्टार ट्रिपल एचने मुंबई इंडियन्सला दिलेला शब्द पाळला आहे.
मुंबई: वर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेंट अर्थात WWE सुपरस्टार ट्रिपल एचने आपलं आश्वासन पूर्ण केलं आहे. ट्रिपल एचने आपला चॅम्पियनशिपचा बेल्ट आयपीएल 2017 चा विजेता संघ मुंबई इंडियन्सला दिला आहे.
यंदा आयपीएलच्या दहाव्या मोसमाची ट्रॉफी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने जिंकली.
मुंबई इंडियन्सने 22 मे रोजी रायझिंग पुणेचा पराभव करुन तिसऱ्यांदा अजिंक्यपदावर नाव कोरलं.
त्याचवेळी रेसलर ट्रिपल एचने ट्विट करुन, लवकरच रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला एक भेट देणार असल्याचं म्हटलं होतं.
https://twitter.com/TripleH/status/866654000640294913
त्यानुसार 13 जुलैला ट्रिपल एचने पुन्हा ट्विट करुन आपण WWE चा किताब अर्थात बेल्ट पाठवत असल्याचं म्हटलं. या ट्विटमध्ये त्याने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मालाही मेन्शन केलं.
ट्रिपल एच म्हणतो, "मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा, मी शब्द दिल्याप्रमाणे, WWE चा पुरस्कार तुमच्यासाठी येत आहे. अभिनंदन"
https://twitter.com/TripleH/status/885356282739294210
WWE चॅम्पियन्सशिपच्या या बेल्टवर मुंबई इंडियन्सचाही लोगो आहे.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात WWE चा फिवर पाहायला मिळाला होता. 11 मे रोजी झालेल्या गुजरात लायन्स आणि दिल्ली डेयरडेव्हिल्स यांच्यातील सामन्यात बिग ई आणि कोफी किंग्टस्टन यांनी गेस्ट पॅनेल म्हणून हजेरी लावली होती.
आयपीएलसारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरुन त्यांनी भारतात WWE चं प्रमोशन करण्याचा प्रयत्न केला होता.
मुंबई इंडियन्सने ज्यावेळी ट्रॉफी जिंकली, त्याचवेळी भारतीय रेसलर जिंदर महलनेही WWE चॅम्पियन्सशिप जिंकली होती.
मुंबईने आयपीएलच्या फायनलमध्ये पुण्याचा अवघ्या 1 धावेने पराभव केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
Advertisement