एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Wrestling Federation Of India Office : राहत्या घराला कुस्ती कार्यालय करून टाकलेल्या बृजभूषण सिंह यांना आणखी एक झटका

क्रीडा मंत्रालयाने संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली नव्याने स्थापन केलेल्या WFI पॅनेलला निलंबित केले होते. संजय सिंह यांची WFI अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तीन दिवसांनी मंत्रालयाने हे पाऊल उचलले होते.

Wrestling Federation Of India Office : क्रीडा मंत्रालयाने गंभीर आक्षेप घेतल्यानंतर आज शुक्रवारी (29 डिसेंबर) भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या निवासस्थानातून (Brij Bhushan Sharan Singh)  कार्यालय हटवण्यात आलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, एका सूत्राने सांगितले की, "बृजभूषण सिंह यांचा परिसर रिकामा केल्यानंतर WFI नवी दिल्लीतील नवीन पत्त्यावरून काम करेल." WFI चे नवीन कार्यालय नवी दिल्लीतील हरी नगर भागात आहे.

कारवाईमागे कार्यालय हे सुद्धा कारण 

24 डिसेंबर रोजी क्रीडा मंत्रालयाने संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली नव्याने स्थापन केलेल्या WFI पॅनेलला निलंबित केले होते. संजय सिंह यांची WFI अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तीन दिवसांनी मंत्रालयाने हे पाऊल उचलले होते. बृजभूषण यांच्या निवासस्थानातून सुरू असलेलं कार्यालय हेही या कठोर कारवाईमागे एक कारण असल्याचे सांगण्यात आले होते. 

मंत्रालयाने आपल्या पत्रात म्हटले आहे की, "फेडरेशनचे कामकाज माजी पदाधिकारी (बृजभूषण) यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या जागेतून चालवले जात आहे. हा देखील ते कथित परिसर आहे ज्यामध्ये खेळाडूंच्या लैंगिक छळाचे आरोप झाले आहेत. सध्या न्यायालय या प्रकरणाची सुनावणी करत आहे. मंत्रालयाने असेही म्हटले होते की नवीन पॅनेल माजी (WFI) अधिकार्‍यांच्या पूर्ण नियंत्रणाखाली काम करत आहे, जे राष्ट्रीय क्रीडा संहितेच्या नियमानुसार नव्हते. 

बृजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीगीरांचा विरोध

ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक आणि जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगट यांच्यासह अनेक अव्वल कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत आणि या प्रकरणाची दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी आणि विनेश यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्यावर कारवाईची मागणी करत दिल्लीतील जंतरमंतरवर अनेक दिवस आंदोलन केले होते.

21 डिसेंबर रोजी बृजभूषण यांच्या जवळचे मानले जाणारे संजय सिंह यांची WFI च्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर साक्षी मलिकने कुस्ती सोडण्याची घोषणा केली होती, तर बजरंगने त्यांचे पद्मश्री परत केले आहे आणि विनेश फोगटने खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप खासदार बृजभूषण यांच्या निकटवर्तीयाकडून महासंघ चालवू नये, असे या कुस्तीपटूंनी म्हटले आहे.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) ने पुन्हा एकदा वुशू असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रमुख भूपेंद्र सिंह बाजवा यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange on Devendra Fadnavis | तू पुन्हा आला की मी पुन्हा बसणार, जरांगेंचा फडणवीसांना इशाराKangana Ranaut On HIndu : देशात अजूनही हिंदू काही ठिकाणी फिरु शकत नाहीRaj Thackeray MNS Symbol :राज ठाकरेंच्या मनसेची मान्यता रद्द होणार?Anant Kalse On Vidhan Sabha | मनसेची मान्यता रद्द होणार? अनंत कळसे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
Embed widget