एक्स्प्लोर

ZIM vs NED: 'हम तो डूबे हैं सनम, तुम को भी ले डूबेंगे' स्पर्धेबाहेर पडलेल्या नेदरलँड्सकडून झिम्बाब्वेचा पत्ता कट

T20 World Cup 2022: एडिलेड (Adelaide) येथे झिम्बाब्वेविरुद्ध सामन्यात नेदरलँड्सच्या संघानं (Zimbabwe vs Netherlands) 30 धावांनी विजय मिळवला आहे.

T20 World Cup 2022: एडिलेड (Adelaide) येथे झिम्बाब्वेविरुद्ध सामन्यात नेदरलँड्सच्या संघानं (Zimbabwe vs Netherlands) 30 धावांनी विजय मिळवला आहे. नेदरलँड्सच्या संघाचा सुपर 12 फेरीतील पहिलाच विजय आहे. या विजयासह आधीच स्पर्धेबाहेर झालेल्या नेदरलँड्सनं झिम्बाब्वेच्या संघाला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवलाय. दरम्यान, सुपर-12 फेरीतील ब ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका, भारत, बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात सेमीफायनलचं तिकट मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. या ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका आणि भारत यांची सेमीफायनलमध्ये पोहचण्याची शक्यता अधिक आहे. 

या सामन्यात नेदरलँड्सच्या संघानं  नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, नेदरलँड्सच्या संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर झिम्बाब्वेच्या संघानं गुडघे टेकले. झिम्बाब्वेला निर्धारित 19.2 षटकात 117 धावांवर ऑलआऊट झाला. झिम्बाब्वेकडून सिकंदर रजानं सर्वाधिक 40 धावा केल्या. तर, सीन विलियम्सनं 28 धावांचं योगदान दिलं. या दोघांशिवाय झिम्बाब्वेच्या इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठू शकला नाही. नेदरलंड्सनं पॉल व्हॅन मेकर्ननं तीन विकेट्स घेतल्या. त्याचवेळी पाकिस्तानविरुद्ध दुखापतग्रस्त झालेल्या बस डी लीडेनंही चांगली गोलंदाजी केली. त्यानं चार षटकांत 14 धावा देत दोन विकेट्स घेतल्या. 

झिम्बाब्वेच्या संघानं दिलेलं लक्ष्य नेदरलँड्सच्या संघानं आठराव्या षटकातच पूर्ण केलं. नेदरलँड्सनं हा सामना पाच विकेट्सनं जिंकला. नेदरलँड्सकडून मॅक्स ओडाउडनं 47 चेंडूत 53 धावांची खेळी केली. तर, टॉम कूपरनं 32 धावांचं योगदान दिलं. याशिवाय, बास डी लीडेनं 12 चेंडूत नाबाद 12 धावांची खेळी केली. टी-20 विश्वचषकातील सुपर-12 फेरीतील नेदरलँड्सच्या संघाला पहिला विजय आहे. या सामन्यात अर्धशतकीय खेळी करणाऱ्या  मॅक्स ओडाउड सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. 

झिम्बाब्वेचा संघ:
वेस्ली मधेवेरे, क्रेग एर्विन (कर्णधार), रेगिस चकाब्वा (विकेटकिपर), शॉन विल्यम्स, सिकंदर रझा, मिल्टन शुम्बा, रायन बर्ल, ल्यूक जोंगवे, तेंडाई चतारा, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी बेंचब्रॅड इव्हान्स, वेलिंग्टन मसाकाड्झा, टोनी मसाकादवे, टोनी मूनयोन्गा, क्लिव मडाने.

नेदरलँड्सचा संघ:
स्टीफन मायबर्ग, मॅक्स ओडॉड, टॉम कूपर, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/विकेटकिपर), रोएलॉफ व्हॅन डेर मर्वे, लोगन व्हॅन बीक, फ्रेड क्लासेन, पॉल व्हॅन मीकेरेन, ब्रँडन ग्लोव्हरबेंच टिम प्रिंगल, तेजा निदामनुरु, शरीझ अहमद, टिम व्हॅन डर गुगटेन.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget