एक्स्प्लोर

KL Rahul : हुश्श!!! क्लासिक केएल पुन्हा फॉर्मात, बांग्लादेशविरुद्ध 31 चेंडूत ठोकलं अर्धशतक

KL Rahul Half century : बांग्लादेशविरुद्ध भारतीय सलामीवीर केएल राहुलनं अर्धशतक पूर्ण केलं, त्यामुळे मागील काही सामने खराब फॉर्मात असलेला राहुल पुन्हा फॉर्मात आल्यानं भारतीय चाहते आनंदी झाले आहेत.

KL Rahul in T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत भारताचा सलामीवीर केएल राहुल सलग तीन सामन्यात फारत कमी धावा करुन बाद झाला होता. त्यामुळं त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. पण आज बांग्लादेशविरुद्ध त्यानं दमदार असं अर्धशतक ठोकत टीकाकारांची तोंडं बंद केली. अवघ्या 31 चेंडूत त्यानं 50 धावा ठोकल्या. पण पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला असला तरी भारताला एक मजबूत सुरुवात त्यानं नक्कीच करुन दिली.

केएल राहुल टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) मध्ये फ्लॉप ठरत होता. स्पर्धेत त्याने सुरुवातीचे 3 सामने खेळले असताना तो या साऱ्यात मिळून केवळ 22 धावाच करु शकला.  सलामीवीर म्हणून येऊनही त्याने इतक्या कमी धावा केल्यामुळे त्याच्यावर बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात त्याला 8 चेंडूत केवळ 4 धावा करता आल्या होत्या. यानंतर, नेदरलँडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात राहुलने 12 चेंडूत केवळ 9 धावाच केल्या. आजही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याची बॅट शांतच राहिली. या सामन्यात तो 14 चेंडूत अवघ्या 9 धावा करून तंबूत परतला. राहुलचा खराब फॉर्म भारतीय संघाची चिंता वाढवत असताना आज मात्र बांग्लादेशविरुद्ध मैदानात उतरुन त्यानं अर्धशतक ठोकलं. सुरुवातीला काहीसा संथगतीने तो खेळत होता. पण काही चौकार आल्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढला आणि 31 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार ठोकत केएल राहुलनं 50 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. आता या स्पर्धेत होणाऱ्या उर्वरित सामन्यांमध्ये राहुलच्या कामगिरीकडे सर्वाचेच लक्ष असेल.

केएल राहुलची टी20 कारकिर्द

केएल राहुल भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅट खेळला आहे त्यामुळे तो एक महत्त्वाचा खेळाडू आहे. दरम्यान त्याच्या टी-20 कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत एकूण 70 टी-20 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 66 डावांमध्ये राहुलने 38.09 च्या सरासरीने आणि 139.11 च्या स्ट्राईक रेटने एकूण 2209 धावा केल्या आहेत. त्याचवेळी 110* धावा हा त्याचा उच्चांक ठरला आहे.

हे देखील वाचा-

IND vs BAN, Toss Update : नाणेफेकीचा कौल बांग्लादेशच्या बाजूने, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, भारतीय फलंदाज मैदानात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune News: पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
Jitendra Awhad on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
Sanjay Raut: एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaJammu Kashmir Assembly Conflict : कलम 370 पुन्हा लागू करण्याच्या प्रस्तावावरून  धक्काबुक्कीChhagan Bhujbal Book : छगन भुजबळांसंबंधी पुस्तकात काय आहेत  कथित  दावे ?ABP Majha Headlines :  10 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
Jitendra Awhad on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
Sanjay Raut: एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या आज सांगली, कोल्हापूर, सातारमध्ये सभा; कोल्हापूर दक्षिणला सभा होणार की नाही?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या आज सांगली, कोल्हापूर, सातारमध्ये सभा; कोल्हापूर दक्षिणला सभा होणार की नाही?
Devendra Fadnavis : फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक तर सुप्रिया सुळे व्यवस्थापिका; देवेंद्र फडणवीस कडाडले
फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक तर सुप्रिया सुळे व्यवस्थापिका; देवेंद्र फडणवीस कडाडले
Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Embed widget