IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अश्विनकडून घडली 'अशी' चूक; पाकिस्तान चाहते बोलतायेत 'चीटर'
IND vs PAK, T20 World Cup 2022: मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 विश्वचषकातील महामुकाबला खेळला गेला ज्यात भारतानं 4 गडी राखून पाकिस्तानला मात दिली.
R Ashwin in IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात पार पडलेल्या रोहर्षक सामन्यात भारतानं 4 विकेट्सनं विजय मिळवला. ज्यानंतर सर्व भारतात एकच जल्लोष होताना दिसत आहे. सोशल मीडियातर टीम इंडिया आणि विराट कोहलीचा नुसता जयघोष करत आहे. पण अशातच पाकिस्तानी चाहते सामना सुरु असताना आर आश्विननं केलेल्या एका चूकीमुळे त्याची खिल्ली उडवत त्याला चीटर चीटर म्हणून संबोधित करत होते. तर पाकिस्तानच्या डावातील आठव्या षटकात असं काय घडलं? ज्यानंतर पाकिस्तानी चाहते भारताचा फिरकीपटू आर.अश्विनला चिटर बोलू लागले, ते पाहूया...
पाकिस्तानच्या डावातील आठव्या षटकात कर्णधार रोहित शर्मानं वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीला गोलंदाजीसाठी बोलावलं. या षटकात पाकिस्तानचा फलंदाज शान मसूद पूल शॉट खेळला आणि फाइन लेगवर उभा असलेल्या अश्विननं धावत येऊन झेल पकडला. मात्र, त्यानं पण चेंडू त्याच्या हातात येण्याआधीच जमिनीला स्पर्श झाला होता. पण झेल घेताना अश्विनला वाटले की त्यानं झेल पूर्ण केलाय. त्यावेळी मसूदनं क्रीज न सोडता तिसऱ्या पंचाकडं झेलची अपील केली. ज्यात चेंडू अश्विनच्या हातात येण्यापूर्वीच जमीनीला स्पर्श झाल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान आश्विनने स्वत:हून आधीच झेल योग्यरितीने पकडलेला नाही असं न सांगितल्यामुळे पाकिस्तानी चाहते अशाप्रकारे टीका करताना दिसत आहेत.
हीच ती सुटलेली कॅच
चार गडी राखून भारत विजयी
नाणेफेक जिंकत भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानला भारतासमोर आधी फलंदाजी करणं अवघड ठरत असल्यानं रोहितनं हा निर्णय़ घेतला. त्यानुसारच भारतीय गोलंदाजांनी सुरुवातही दमदार केली. पाकिस्तानचा कर्णधार बाबरला 0 धावांवर तंबूत धाडत अर्शदीपने पहिली विकेट घेतली. त्यानंतरही भारताने गोलंदाजी कसून सुरुच ठेवली. 4 धावा करुन रिझवानही बाद झाला. पण त्यानंतर शान मकसूद (52) आणि इफ्तिकार अहमद (51) यांनी डाव सावरला आणि दोघांनी दमदार अर्धशतकं ठोकत पाकिस्तानची धावसंख्या सावरली. त्यांच्याशिवाय इतर फलंदाज स्वस्तात माघारी परतत होते. पण गोलंदाज शाहीन आफ्रिदीने 8 चेंडूत 16 धावांची खेळी करत आणखी योगदान दिलं. ज्यामुळे पाकिस्तानने 159 धावा स्कोरबोर्डवर लावल्या.
भारतीय संघानं 160 धावांचं लक्ष्य गाठताना चार विकेट्स राखून विजय मिळवला. पाकिस्ताननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. पावर प्लेमध्ये भारताने कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची महत्वाची विकेट्स गमावली. त्यानंतर सूर्यकुमार यादवही स्वस्तात बाद झाला. मात्र, त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्यानं संघाची जबाबदारी खांद्यावर घेत भारताच्या विजयाचा पाया रचला. अखेरच्या षटकात भारताला 16 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच चेंडूवर हार्दिक पांड्या बाद झाला. मात्र, विराट कोहलीनं संघाची बाजू संभाळून ठेवत भारताला विजय मिळवून दिला.
हे देखील वाचा-