IND vs ENG: रन मशीन सुसाट, विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण
Virat Kohli: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील दुसरा सेमीफानयल सामना खेळला जातोय.
Virat Kohli: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील दुसरा सेमीफानयल सामना खेळला जातोय. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 4000 हजार धावांचा टप्पा गाठलाय. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 4000 धावांचा टप्पा गाठणारा विराट कोहली पहिला खेळाडू ठरलाय.
इंग्लंडविरुद्ध सामन्यापूर्वी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 4000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी विराट कोहलीला अवघ्या 42 धावांची गरज होती. या सामन्यात तडाखेबाज फलंदाजी करत विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील 4000 हजार धावा पूर्ण केल्या.
टी-20 आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा
आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीनंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. रोहित शर्मानं आतापर्यंत 148 सामने खेळले आहेत. ज्यात 31.32 च्या सरासरीनं त्यानं 3 हजार 853 धावा केल्या आहेत. यानंतर न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज मार्टिन गप्टिल 3 हजार 531 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 3 हजार 3223 धावांसह चौथ्या आणि आयर्लंड पॉल स्टर्लिंग 3 हजार 181 धावांसह पाचव्या स्थानावर आहे.
क्रमांक | फलंदाज | सामने | धावा |
1 | विराट कोहली | 115 | 4008 |
2 | रोहित शर्मा | 148 | 3853 |
3 | मार्टिन गप्टिल | 122 | 3531 |
4 | बाबर आझम | 98 | 3323 |
5 | पॉल स्टर्लिंग | 121 | 3181 |
भारताचं इंग्लंडसमोर 169 धावांचं लक्ष्य
या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरनं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघानं निर्धारित 20 षटकात सहा विकेट्स गमावून इंग्लंडसमोर 169 धावांचं लक्ष्य ठेवलं. भारताकडून विराट कोहली आणि हार्दिक पांड्यानं अर्धशतकीय खेळी केली.
हे देखील वाचा-