IND vs SA: भारतानं द.आफ्रिकेविरुद्ध सामना जिंकला असता, पण 'या' पाच चुका पडल्या महागात
T20 World Cup 2022: भारताची टी-20 विश्वचषकातील विजयी घौडदौड थांबली आहे.
T20 World Cup 2022: भारताची टी-20 विश्वचषकातील विजयी घौडदौड थांबली आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध आज खेळण्यात आलेल्या सुपर 12 फेरीतील सामन्यात भारताला पाच विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेच्या संघला कडवी झुंज दिली. मात्र, अखेरिस सामन्याचा निकाल दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनं लागला आहे. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी बऱ्याच चुका केल्या. परिणामी, भारताच्या पदरात निराशा पडली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोणत्या चुका भारताला महागात पडल्या? यावर एक नजर टाकुयात.
टॉसची भूमिका
या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कारण, या खेळपट्टीवर काही सामने खेळले गेले होते. ज्यामुळं संघाला मोठी धावसंख्या उभारता आली असते. परंतु, दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भेदक गोलंदाजी करत भारताचा निर्णय अयोग्य ठरवला. भारतानं गोलंदाजी निवडली असते तर, कदाचित सामन्याचा निकाल भारताच्या बाजूनं लागला असता.कारण, या सामन्यात भारतीय संघ सात फलंदाजासह मैदानात उतरला होता.
भारताचा फलंदाजीचा दृष्टिकोन
नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडणं आणि 7 फलंदाजांसह मैदानात उतरणं म्हणजे भारताचा फलंदाजीचा दृष्टिकोन वादळी असेल. परंतु केएल राहुलला पहिल्या षटकात एकही धाव घेता आली नाही. रोहित शर्मा दुसऱ्या षटकात फलंदाजीसाठी क्रिजवर आला, तेव्हा त्यानंही तीन चेंडू निर्धाव खेळल्या. त्यानंतर चौथ्या चेंडूवर षटकार ठोकला. पुढच्याच षटकात केएल राहुलनं षटकार मारला, पण अधिक निर्धाव चेंडू खेळले गेले. त्यानंतर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात दोघंही झेलबाद झाले. त्यानंतर विराट कोहली, हार्दिक पांड्यानंही स्वस्तात विकेट्स गमावली.
हुडाला संघात सामील करण्याचा प्लॅन फसला
या सामन्यात भारतीय संघानं फक्त पाच गोलंदाजी पर्यायांसह हा सामना खेळला. अक्षर पटेलच्या जागी दीपक हुडाची अतिरिक्त फलंदाज म्हणून निवड करण्यात आली, परंतु टीम इंडियाचा हा प्लॅन अपयशी ठरला. दीपक हुडा खातं न उघडताच माघारी परतला. त्यामुळं संघ आणखी दबावाखाली आला. या सामन्यात ऋषभ पंतला खेळवलं जाऊ शकत होतं.
अश्विन, हार्दिकची निराशाजनक कामगिरी
भारतानं दिलेल्या 134 धावांचं लक्ष्य रोखण्यासाठी भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शामीनं अतोनात प्रयत्न केले. मात्र, हार्दिक पांड्या आणि आर. अश्विनच्या गोलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी खूप धावा लुटल्या. अश्विननं चार षटकात 43 धावा देत एक विकेट्स घेतली. तर, पांड्यानं चार षटकात 29 धावा दिल्या.
विराटचा झेल आणि रोहित शर्माकडून रनआऊटची संधी हुकली
या सामन्यात भारताचा फलंदाज विराट कोहलीनं एडन मार्करामचा झेल सोडला. तर, रोहित शर्मानंही त्याला रनआऊट करण्याची संधी हुकवली. ज्यावेळी विराटनं मार्करामचा झेल सोडला, तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघाची स्थिती चांगली नव्हती. त्यानंतरही रोहित शर्मा मार्करामला रनआऊट करण्यास यशस्वी ठरला असता तर, कदाचित भारताच्या पुनरागमनाच्या पूर्ण शक्यता होत्या. कारण, या सामन्यात मार्करामनं तुफानी फलंदाजी करता दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या विजयाचा पाया रचला.
हे देखील वाचा-