SL vs NED T20 WC 2022 : अखेर श्रीलंकेचा संघ सुपर 12 मध्ये दाखल, नेदरलँडवर 16 धावांनी मिळवला विजय
T20 World Cup 2022 : श्रीलंकेचा फलंदाज कुसल मेंडीसची 79 धावांची स्फोटक खेळी आणि नंतर गोलंदाजांची भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने नेदरलँड संघावर विजय मिळवला आहे.
T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात सुरु टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेचे सुपर 12 साठीचे क्वॉलीफायर सामने आता संपत आले असून ग्रुप ए मधील पहिला क्वॉलीफायड संघ म्हणून श्रीलंकेचा संघ समोर आला आहे. त्यांनी 3 पैकी 2 सामने जिंकत चांगल्या रनरेटने सुपर 12 मध्ये एन्ट्री मिळवली आहे. नुकत्याच झालेल्या नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेने (SL vs NED) 16 धावांनी विजय मिळवला. यावेळी श्रीलंकेचा फलंदाज कुसल मेंडीसची 79 धावांची स्फोटक खेळी आणि नंतर गोलंदाजांची भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने नेदरलँड संघावर विजय मिळवला आहे. सामन्यात आधी फलंदाजी करत श्रीलंकेनं 162 धावा केल्या, ज्यांचा पाठलाग करताना नेदरलँडचा संघ 20 ओव्हरमध्ये 146 धावाच करु शकला आणि सामना श्रीलंकेनं 16 धावांनी जिंकला.
Sri Lanka beat Netherlands by 16 runs to seal their qualification to the Super 12 stage 👏#T20WorldCup | #NEDvSL | 📝 https://t.co/mBr5xrkvMw pic.twitter.com/3R4EdIo7cV
— ICC (@ICC) October 20, 2022
ऑस्ट्रेलियाच्या सायमंड्स क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडलेल्या आजच्या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी निवडली. ज्यानंतर त्यांचा सलामीवीर कुसल मेंडीसने सुरुवातीपासून दमदार खेळ दाखवला. पाथुम निसांका 14 धावा करुन बाद झाला, ज्यानंतर मेंडीसने असलांकासोबत एक चांगली भागिदारी केली. असलांका 31 धावा करुन तंबूत परतला. पण अखेरच्या ओव्हरपर्यंत क्रिजवर राहत मेंडीसने 44 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकार ठोकत 79 धावा केल्या, ज्याच्या जोरावर श्रीलंका संघाने 162 धावा स्कोरबोर्डवर लावल्या.
सलामीवीर मॅक्सची झुंज व्यर्थ
ज्यानंतर 163 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या नेदरलँड संघाकडून लक्ष्य गाठण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करण्यात आले, खासकरुन त्यांचा सलामीवीर मॅक्स ओडवडने नाबाद 71 धावांची झुंज दिली, पण त्याला दुसऱ्या कोणत्याही फलंदाजाची साथ न मिळाल्याने नेदरलँडचा संघ 20 षटकात 146 धावाच करु शकला. तसंच श्रीलंकेच्या गोलंदाजांनी मात्र चांगली गोलंदाजी केली खासकरुन त्यांचा स्टार ऑलराऊंडर वानिंदू हसरंगाने 28 धावा देत 3 विकेट्स घेतले. महेश तीक्ष्णाने 2 तर लाहिरु कुमारा आणि फर्नांडोने प्रत्येकी 1 विकेट घेतली. सामन्यात श्रीलंकेकडून 44 चेंडूत 79 धावांची धमाकेदार खेळी करणाऱ्या कुसल मेंडीसला सामनावीराचा पुरस्कार त्यालाच देण्यात आला.
हे देखील वाचा-