T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात पाकिस्तानची कामगिरी शून्यच; आतापर्यंत एकही टी-20 सामना नाही जिंकला!
T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकातील सुपर-12 फेरीतील महत्वाच्या सामन्यात झिम्बाब्वेच्या संघानं पाकिस्तानचा (ZIM vs PAK) अवघ्या एका धावेनं पराभव केला.
T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकातील सुपर-12 फेरीतील महत्वाच्या सामन्यात झिम्बाब्वेच्या संघानं पाकिस्तानचा (ZIM vs PAK) अवघ्या एका धावेनं पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या झिम्बाब्वेच्या संघानं निर्धारित 20 षटकात आठ विकेट्स गमावून 130 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 129 धावाचं करू शकला. या स्पर्धेतील पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव आहे. झिम्बाब्वेविरुद्ध पराभवानंतर पाकिस्तानच्या जखमेवीर मीठ चोळणारी आकडेवारी समोर आलीय. पाकिस्तानच्या संघानं ऑस्ट्रेलियात आतापर्यंत सहा टी-20 सामने खेळला आहे. मात्र, अद्याप त्यांना एकही सामना जिंकता आला नाही.
ट्वीट-
T20i wins in Australia:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 27, 2022
Zimbabwe - 3.
Pakistan - 0.
पाकिस्तानची ऑस्ट्रेलियातील कामगिरी
पाकिस्ताननं आतापर्यंत ऑस्ट्रेलियात सहा टी-20 सामने खेळले आहेत. ज्यात दोन सामने यंदाच्या टी-20 विश्वचषकातील आहेत. यातील तीन सामन्यात पाकिस्तानच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. तर, एक सामना रद्द झालाय. पाकिस्तानच्या संघानं 2010 मध्ये ऑस्ट्रेलियात पहिला टी-20 सामना खेळला होता, ज्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2019 मध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियात गेला होता. या मालिकेत पाकिस्तानच्या संघाला एकही सामना जिंकता आला नाही. ऑस्ट्रेलियात पाकिस्तानची धावसंख्या 159 इतकी आहे, जी त्यांनी टी-20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात भारताविरुद्ध उभारली . या सामन्यातही पाकिस्तानच्या संघाला पराभवाला सामारे जावा लागलं. त्यानंतर आज झिम्बाब्वेविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यातही पाकिस्तान पराभूत झाला.
झिम्बाब्वेचं पाकिस्तानसमोर 131 धावांचं आव्हान
पाकिस्तानविरुद्ध आज पर्थ स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या सामन्यात झिम्बाब्वेच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करत झिम्बाब्वेच्या संघानं निर्धारित 20 षटकात आठ विकेट्स गमावून पाकिस्तानसमोर 131 धावांचं लक्ष्य ठेवलं. झिम्बाब्वेकडून सेन विल्यम्सनं सर्वाधिक 31 धावांची खेळी केली.पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम ज्युनिअर उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्यानं या सामन्यातील चार षटकात 24 धावा खर्च करून सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर शादाब खाननं तीन विकेट्स घेतल्या. तर,हारिफ रौफच्या खात्यात एक विकेट्स जमा झाली.
झिम्बाब्वेचा अवघ्या धावेनं विजय
दरम्यान, 131 धावांचं लक्ष्य रोखण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेच्या संघानं पाकिस्तानच्या नाकी नऊ आणले. बाबर आझम आणि रिझवान लवकर बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ स्वतःला सावरू शकला नाही. अखेरच्या षटकात 11 धावांची गरज असताना पाकिस्तानच्या संघाला अवघ्या एका धावेनं पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेतील सलग दुसऱ्या पराभवामुळं पाकिस्तानची टी-20 विश्वचषकातून बाहेर पडण्याची शक्यता वाढलीय.
हे देखील वाचा-