IND vs PAK : ऑस्ट्रेलियात टी 20 मध्ये पाकिस्तानची पाटी कोरीच, भारताची जबरदस्त कामगिरी
IND vs PAK : पाकिस्तानचे भेदक गोलंदाज आणि भारताची विस्फोटक फलंदाजी, असा सामना रंगण्याची शक्यता आहे. दोन्ही संघ विजयाच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहेत.
IND vs PAK : ऑस्ट्रेलियामध्ये टी 20 विश्वचषकाला दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडनं यजमान आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव केला. रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघ यंदाच्या टी 20 विश्वचषकातील पहिला सामना खेळणार आहेत. पाकिस्तानचे भेदक गोलंदाज आणि भारताची विस्फोटक फलंदाजी, असा सामना रंगण्याची शक्यता आहे. दोन्ही संघ विजयाच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहेत. टी 20 क्रिकेटमध्ये पण दोन्ही संघाची ऑस्ट्रेलिायत कामगिरी कशी आहे? हे जाणून घेणं महत्वाचं आहे.
ऑस्ट्रेलियात पाकिस्तानची पाटी कोरीच
पाकिस्तानने ऑस्ट्रेलियात आतापर्यंत चार टी 20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांची पाटी कोरीच राहिली आहे. तीन सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला, तर एक सामना रद्द करावा लागला होता. 2010 मध्ये पाकिस्तानने ऑस्ट्रेलियात पहिला टी 20 सामना खेळला होता. त्यानंतर 2019 मध्ये तीन सामन्याची मालिका खेळली होती. ऑस्ट्रेलियात पाकिस्तानच्या संघाला 150 ची धावसंख्याही पार करता आली नाही. ऑस्ट्रेलियात पाकिस्तानची सर्वेच्च धावसंख्या 150 इतकी आहे. पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियात आपला पहिला विजय मिळवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार यात शंकाच नाही.
ऑस्ट्रेलियात भारताची जबरदस्त कामगिरी -
ऑस्ट्रेलियात टी 20 क्रिकेटमध्ये भारताची कामगिरी जबरदस्त आहे. भारताने ऑस्ट्रेलियात आतापर्यंत 12 सामन्यात सात विजय मिळवले आहेत. तर चार सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. एक सामना रद्द करण्यात आला होता. भारताने फेब्रुवारी 2008 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात टी 20 सामना खेळला होता. तर डिसेंबर 2020 मध्ये अखेरचा सामना खेळला आहे.
ऑस्ट्रेलियात झालेल्या पहिल्या टी 20 सामन्यात भारताचा संघ 74 धावांवर पोहचला होता. ऑस्ट्रेलियातील ही भारताची निचांकी धावसंख्या आहे. तर 198 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. 2016 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियामध्ये 198 धावांचा डोंगर उभारला होता. ऑस्ट्रेलियातील 11 डावात भारताने 150 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
टी 20 विश्वचषकात कसं आहे भारताचं वेळापत्रक?
सामना | तारीख | वेळ |
भारत विरुद्ध पाकिस्तान | 23 ऑक्टोबर | दुपारी 1.30 वाजता |
भारत विरुद्ध नेदरलँड | 27 ऑक्टोबर | दुपारी 12.30 वाजता |
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका | 30 ऑक्टोबर | दुपारी 4.30 वाजता |
भारत विरुद्ध बांग्लादेश | 2 नोव्हेंबर | दुपारी 1.30 वाजता |
भारत विरुद्ध झिम्बाब्वे | 6 नोव्हेंबर | दुपारी 1.30 वाजता |