T20 World Cup 2022: 'जर कोणी मला 'मंकडिंग' पद्धतीनं आऊट केल्यास...' हुकमी एक्का हार्दिक पांड्याची हटके प्रतिक्रिया
T20 World Cup 2022: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मानं इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील सामन्यादरम्यान इंग्लंडची फलंदाज शार्लोट डीनला मंकडिंगद्वारे बाद केलं होतं.
T20 World Cup 2022: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मानं इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील सामन्यादरम्यान इंग्लंडची फलंदाज शार्लोट डीनला मंकडिंगद्वारे बाद केलं होतं. तेव्हापासून मंकडिंग विकेट्सच्या मुद्द्यानं चांगलाच पेट घेतलाय. यावर अनेक दिग्गज क्रिकेटपटू आणि क्रिकेट तज्ज्ञांनी आपलं मत मांडलंय. आता भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानंही (Hardik Pandya) यावर आपली प्रतिक्रिया दिलीय.
नुकतीच ‘एमसीसी’ म्हणजेच मेरिलिबोन क्रिकेट क्लबनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमांमध्ये नव्या बदलांची घोषणा केली. ज्यात मंकडिंगला रनआऊटचा दर्जा दिला गेला. मंकडिंग म्हणजेच गोलंदाज गोलंदाजी करत असताना चेंडू टाकण्यापूर्वी फलंदाज नॉन स्ट्राईक एंडच्या पुढं गेल्यास त्याला रनआऊट करू शकतो. भारताचे माजी क्रिकेटपटू विनू मंकड यांनी ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक-फलंदाज बिल ब्राऊन यांनी नॉन-स्ट्रायकरला क्रीझ सोडली असताना या पद्धतीनं रनआऊट केलं होतं. मंकड यांनी ब्राऊन याला आधी अनेकदा ताकीदसुद्धा दिली होती. ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी या प्रकाराला ‘मंकडिंग’ असंच नाव दिलं.
हार्दिक पांड्या काय म्हणाला?
आयसीसी पॉडकास्टमध्ये मंकडिंग विकेट्ससंदर्भात बोलताना हार्दिक पंड्या म्हणाला की, “मला वाटतं आता याबाबतची चर्चा बंद व्हायला हवी. कारण हे आता अधिकृत झालंय. उद्या मला कोणी अशाप्रकारे बाद केलं तर मी स्वतः मैदान सोडेल. मला याचा राग येणार नाही. कारण, ही माझी चुकी असेल. मंकडिंगला धावबादचा दर्जा दिला गेला असला तरी, अजूनही अशा पद्धतीनं रनआऊट केल्यास खेळाडू वृत्तीची चर्चा होते.”
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मंकडिंग पद्धतीनं आऊट होणारे खेळाडू-
1. बिल ब्राउन, ऑस्ट्रेलिया
2. इयान रेडपाथ, ऑस्ट्रेलिया
3. डेरेक रँडेल, इंग्लंड
4. सिकंदर बख्त, पाकिस्तान
5. ब्रायन लकहर्स्ट, इंग्लंड
6. ग्रांट फ्लावर, झिम्बाब्वे
7. पीटर कर्स्टन
8. जोस बटलर
9. मार्क चॅपमॅन
पाकिस्तानविरुद्ध हार्दिक पांड्याची उत्कृष्ट खेळी
पाकिस्तानविरुद्ध टी-20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्यानं उत्कृष्ट खेळ दाखवला. या सामन्यात त्यानं विराट कोहलीची साथ देत 37 चेंडूत 40 धावांची खेळी केली. भारतीय संघानं अवघ्या 31 धावांवर चार विकेट्स गमावले असताना हार्दिक पाड्यानं विराट कोहलीसोबत पाचव्या विकेट्ससाठी 113 धावांची भागेदारी केली. फलंदाजीव्यतिरिक्त हार्दिक पांड्यानं गोलंदाजीतही मोठं योगदान दिलं. पाकिस्तानविरुद्ध त्यानं चार षटकात 30 धावा देत तीन विकेट्स घेतल्या.
हे देखील वाचा-