Sourav Ganguly Trolled: टीम इंडियाचं अभिनंदन करणारे सौरव गांगुली ट्रोल; 'दादा'च्या ट्विटला नेटकऱ्यांचा भन्नाट रिप्लाय
T20 World Cup 2022: पाकिस्तानविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात भारतानं (India vs Pakistan) चार विकेट्सनं विजय मिळवत टी-20 विश्वचषकातील सुरुवात गोड केली.
T20 World Cup 2022: पाकिस्तानविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात भारतानं (India vs Pakistan) चार विकेट्सनं विजय मिळवत टी-20 विश्वचषकातील सुरुवात गोड केली. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) मोक्याच्या क्षणी 53 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी करत भारताला निसटता विजय मिळवून दिला. त्यानंतर सोशल मीडियावर 'किंग इज बॅक' असाही ट्रेन्ड सुरू झाला. तसेच राजकीय नेते, दिग्गज क्रिकेटपटू, सेलिब्रिटीपासून सर्वसामन्य लोकांनी भारतीय खेळाडूंचं सोशल मीडियाद्वारे कौतुक केलं. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनीही भारतीय संघाचं अभिनंदन करणारे ट्विट केलं. परंतु, विराट कोहलीला टॅग न केल्यानं नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलंय.
पाकिस्तानविरुद्ध थरारक विजयानंतर सौरव गांगुली यांनी भारतीय संघासाठी ट्विट केलं. या ट्विटच्या माध्यमातून सौरव गांगुलीनं भारतीय संघाचं अभिनंदन केलं. परंतु, नेटकऱ्यांना सौरव गांगुली यांच्या ट्विटमध्ये कमतरता जाणवली. सौरव गांगुलीनं आपल्या ट्विटमध्ये भारतीय संघाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या. परंतु, भारताच्या विजयाचा हिरो ठरलेल्या विराट कोहलीचा या ट्विटमध्ये उल्लेख केला नाही. ज्यानंतर चाहत्यांमध्ये संतापाची उसळली आणि त्यांनी सौरव गांगुली यांना ट्रोल करायला सुरुवात केली.
ट्वीट-
Man got sacked and virat became a chase master again!
— G🙇♂️ (@rgeek1) October 23, 2022
Thanks for getting sacked dada https://t.co/mxbeUU3F2g
ट्वीट-
Karma is back 🤣 https://t.co/G5PudHNXVj
— RIGDOR LAMA (@LamaRigdor) October 23, 2022
ट्वीट-
pic.twitter.com/9DEdQrgUC7 https://t.co/YasNeCbIn0
— best girl (@awkdipti) October 23, 2022
ट्वीट-
You forgot to tag @imVkohli and @JayShah https://t.co/yI5lKGMPWE
— Angshuman (@RunKalita) October 24, 2022
पाकिस्तानला धुतल्यानंतर विराट कोहलीची प्रतिक्रिया
पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर विराट कोहली म्हणाला की, "या सामन्यातील वातावरण इतकं अप्रतिम होतं की, माझ्याकडं सांगायला शब्दच नाहीत. हे कसं झालं? ते मला माहीत नाही. या क्षणाचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडं शब्दच नाहीत. हार्दिक पांड्यानं मला फलंदाजीदरम्यान सांगितले की, आपण हे लक्ष्य गाठू शकतो, पण त्यासाठी आपल्याला शेवटपर्यंत फलंदाजी करावी लागेल."
हे देखील वाचा-