एक्स्प्लोर

Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडची जबरदस्त खेळी! सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ठोकलं दुसरं शतक, कोहली-शर्मालाही टाकलं मागे

Syed Mushtaq Ali Trophy 2022: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022 च्या आजच्या महाराष्ट्र विरुद्ध केरळ सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराजने 68 चेंडूत 114 धावा करत दमदार शतक ठोकलं आहे.

Ruturaj Century in Syed Mushtaq Ali Trophy 2022 : एकीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी20 विश्वचषक (T20 World Cup 2022) सुरु असून दुसरीकडे देशांतर्गत क्रिकेटमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022 (Syed Mushtaq Ali Trophy 2022) सुरु आहे. यामध्ये महाराष्ट्रा संघाचा कर्णधा ऋतुराज गायकवड (Ruturaj Gaikwad) कमाल फॉर्ममध्ये असून त्याने नुकतंच दुसरं शतक ठोकलं आहे. आधी 24व्या सामन्यात सर्व्हिसेस विरुद्ध 112 धावांची खेळी केल्यानंतर आता केरळविरुद्ध त्याने  68 चेंडूत 114 धावा करत आणखी एक दमदार शतक ठोकलं आहे. 

विशेष म्हणजे या शतकाच्या मदतीने त्याने या स्पर्धेत एकापेक्षा अधिक शतक ठोकत दमदार खेळाडूंच्या यादीत नाव मिळवलं आहे. त्याने कोहली, शर्मा यासारख्या दिग्गजांना मागे टाकलं आहे. दरम्यान या यादीत उन्मुक्त चंदच्या नावावर सर्वाधिक 3 शतकं आहेत. तर ईशान किशन, करुण नायर, मनिष पांडे, श्रेयस अय़्यर आणि आता ऋतुराज गायकवाड यांच्या नावावर दोन शतकं आहेत. ऋतुराजचा फॉर्म पाहता तो आगामी मालिकेत पुन्हा टीम इंडियामध्ये पुनरागमन करेल अशी आशा आहे.

महाराष्ट्राचा विजय

याशिवाय सामन्याचा विचार केल्यास महाराष्ट्राच्या संघाने (Team Maharashtra) प्रथम फलंदाजी करत ऋतुराजच्या दमदार शतकाच्या जोरावर 4 बाद 167 धावांपर्यंत मजल मारली. ज्यानंतर 20 षटकांत 168 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या केरळच्या फलंदाजांना खास कामगिरी करता आली नाही. केरळकडून केवळ रोहन कुन्नुमलने 58 धावांची एकहाती झुंज दिली पण त्याला खास कोणाची साथ न मिळाल्याने केरळचा संघ या लक्ष्याचा पाठलाग करताना 20 षटकांत 127 धावांवर 8 बाद इतकीच मजल मारु शकला. ज्यामुळे 40 धावांनी सामना महाराष्ट्र संघाने जिंकला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून वगळलं

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात नुकत्याच खेळवल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ऋतुराज गायकवाड भारतीय संघाचा भाग होता. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडला संधी देण्यात आली होती. मात्र, या सामन्यात त्यानं संथ खेळी केली. त्यानं 42 चेंडूत अवघ्या 19 धावांची खेळी केली. त्यानंतर उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यातून त्याला वगळण्यात आलं. 

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur ZP election: कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसच भारी; 12 जागावर विजय, राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा घौडदौड
कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसच भारी; 12 जागावर विजय, राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा घौडदौड
ZP Election Result 2026: अजितदादांच्या राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी; जिल्हा परिषदेतील 200 जागांचा चक्रावणारा पहिला कल हाती, मोठी उलथापालथ
अजितदादांच्या राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी; जिल्हा परिषदेतील 200 जागांचा चक्रावणारा पहिला कल हाती, मोठी उलथापालथ
Chhatrapati Sambhajinagar: आठवडी बाजारासमोर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
आठवडी बाजारासमोर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Chhatrapati Sambhajinagar ZP election result 2026: छत्रपती संभाजीनगरच्या 'मिनी मंत्रालयाचा' कारभारी कोण? जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगरच्या 'मिनी मंत्रालयाचा' कारभारी कोण? जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी

व्हिडीओ

ZP BJP Result : 731 पैकी 319 कल-निकाल हाती, निकालांमध्ये भाजपची शंभरी
Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur ZP election: कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसच भारी; 12 जागावर विजय, राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा घौडदौड
कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसच भारी; 12 जागावर विजय, राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा घौडदौड
ZP Election Result 2026: अजितदादांच्या राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी; जिल्हा परिषदेतील 200 जागांचा चक्रावणारा पहिला कल हाती, मोठी उलथापालथ
अजितदादांच्या राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी; जिल्हा परिषदेतील 200 जागांचा चक्रावणारा पहिला कल हाती, मोठी उलथापालथ
Chhatrapati Sambhajinagar: आठवडी बाजारासमोर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
आठवडी बाजारासमोर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Chhatrapati Sambhajinagar ZP election result 2026: छत्रपती संभाजीनगरच्या 'मिनी मंत्रालयाचा' कारभारी कोण? जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगरच्या 'मिनी मंत्रालयाचा' कारभारी कोण? जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Solapur ZP election result 2026 मोठी बातमी! सोलापुरात मोहिते पाटलांना धक्का, उत्तम जानकरांचेही स्वप्न भंगले; भाजपच्या संस्कृती सातपुते विजयी
मोठी बातमी! सोलापुरात मोहिते पाटलांना धक्का, उत्तम जानकरांचेही स्वप्न भंगले; भाजपच्या संस्कृती सातपुते विजयी
Kolhapur ZP and Panchayat Samiti Result: कोल्हापुरात पहिला गुलाल काँग्रेसला; सुरुवातीच्या कलांमध्ये कोल्हापूर झेडपी, पंचायत समितीमध्ये काँग्रेस आघाडीवर; राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर
कोल्हापुरात पहिला गुलाल काँग्रेसला; सुरुवातीच्या कलांमध्ये कोल्हापूर झेडपी, पंचायत समितीमध्ये काँग्रेस आघाडीवर; राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर
Solapur ZP election result 2026: सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल; माढ्यात राष्ट्रवादीने खातं खोललं, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल; माढ्यात राष्ट्रवादीने खातं खोललं, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Sharad Pawar: शरद पवारांना गोविंद बागेत भेटण्यासाठी आलेल्यांना न भेटताच परतावे लागले; कारण...
शरद पवारांना गोविंद बागेत भेटण्यासाठी आलेल्यांना न भेटताच परतावे लागले; कारण...
Embed widget