T20 World Cup 2022: फायनल गमावल्यानंतरही पाकिस्तानच्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस, प्रत्येक खेळाडूला मिळणार कोट्यवधी रुपये
Pakistan Cricket Team Prize Money: वर्ल्ड कप फायनलमध्ये पाकिस्तान संघाला इंग्लंडने 5 विकेट्सनी मात दिली, ज्यामुळे त्याचं विश्वचषक विजयाचं स्वप्न अधुरं राहिलं.
ENG vs PAK : टी20 विश्वचषक स्पर्धेतील (T20 World Cup 2022) पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (PAK vs ENG) हा फायनलचा सामना इंग्लंडने 5 विकेट्सनी जिंकला. ज्यामुळे पाकिस्तानचं दुसऱ्यांदा विश्वचषक विजयाचं स्वप्न अधुरं राहिलं. पण फायनल हरल्यानंतरही पाकिस्तानी संघावर पैशांचा पाऊस पडला असून संघाच्या प्रत्येक खेळाडूला कोटींचे बक्षीस मिळाले आहे. तर संघातील प्रत्येक खेळाडूच्या वाट्याला करोडो रुपये कसे आले, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...
पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून सुमारे दहा लाख डॉलर्सचे बक्षीस मिळाले. यात उपविजेता आणि सुपर-12 मधील सामना जिंकल्याबद्दलच्या बक्षीसांचा समावेश आहे. ही बक्षीस रक्कम पाकिस्तानच्या चलनात रूपांतरित केली तर 22 कोटी 25 लाख इतकी होईल. ज्यानंतर ही रक्कम 17 भागांमध्ये विभागली जाईल, त्यापैकी 16 खेळाडूंना आणि एक भाग व्यवस्थापनाकडे जाईल. ज्यानंतर अंदाजे प्रत्येक खेळाडूला पाकिस्तानी चलनात सुमारे एक कोटी 30 लाख रुपये मिळतील.
एकही सामना न खेळता मिळणार कोट्यवधी रुपये
पाकिस्तान संघातील मोहम्मद हसनैन आणि खुशदिल शाह यांनी T20 विश्वचषकात एकही सामना खेळला नाही, परंतु असे असूनही त्यांना एवढी मोठी रक्कम मिळणार आहे. याशिवाय फखर जमाननेही या स्पर्धेत केवळ एकच सामना खेळला होता, पण असं असूनही त्याला ही मोठी रक्कम मिळणार आहे. स्पर्धेदरम्यान, खेळाडूंना ICC कडून डॉलर्समध्ये भत्ता देखील मिळत होता. जो दरदिवसासाठी अंदाजे 9 हजा 500 रुपये इतका होता. ही रक्कमही या सर्व संघाला मिळणार आहे.
रंगतदार झाला होता फायनलचा सामना
सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकत इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराने घेतलेला गोलंदाजीचा निर्णय बोलर्सनी अगदी योग्य असल्याचं दाखवत अप्रतिम गोलंदाजी करत अवघ्या 137 धावांमध्ये पाकिस्तानला रोखलं. पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आणि रिझवान यांनी चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. पण 15 धावा करुन रिझवान बाद झाला. मग मोहम्मद हॅरीसही 8 धावांवर बाद झाला. कर्णधार बाबर चांगली फलंदाजी करत होता, पण 32 धावा करुन तोही तंबूत परतला. इतरही फलंदाज स्वस्तात माघारी परतत होते. पण शान मसूदने फटकेबाजी करत 28 चेंडूत 38 धावा ठोकत पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा केल्या. इतर फलंदाज खास कामगिरी करु न शकल्याने 137 धावांवर पाकिस्तानचा डाव आटोपला. इंग्लंडकडून सर्वच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पण अष्टपैलू सॅम करनने 4 ओव्हरमध्ये केवळ 12 धावा देत 3 महत्त्वाचे विकेट्स घेतले. त्याने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली. ख्रिस जॉर्डन आणि आदिल राशीद यांनीही प्रत्येकी 2 विकेट्स घेतले. बेन स्टोक्सनं एक महत्त्वाची विकेट घेतली.
ज्यानंतर 138 धावांचं माफक लक्ष्य गाठतानाही इंग्लंडला फार अडचणी आल्या. त्यांची सुरुवातही खास झाली नाही. अॅलेक्से 1 धाव करुन बाद झाला. मग फिलीपही 10 रनांवर तर कर्णधार बटलर 26 रनांवर तंबूत परतला. मग स्कोक्स आणि ब्रुकने डाव सावरला पण ब्रुक 20 रनांवर बाद झाला. स्टोक्सची झुंज कायम होती. त्याला मोईन अलीने साथ दिली, पण 19 रनांवर तोही बाद झाला. ज्यानंतर मात्र स्टोक्सने विजय पक्का करत नाबाद 52 धावांच्या मदतीने संघाला सामना जिंकवून दिला.
हे देखील वाचा-