एक्स्प्लोर

विजयी चौकार लगावत, पाकिस्तानचं स्वप्न धुळीस मिळवणारा दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज कोण? भारताशी खास कनेक्शन!

ICC World Cup 2023: केशव महाराजनं 48व्या षटकात मोहम्मद नवाजच्या दुसऱ्या चेंडूवर विजयी चौकार ठोकला आणि संघाला विजय मिळवून दिला.

ICC World Cup 2023, SA vs PAK: आयसीसी क्रिकेट विश्वचषकात (ICC World Cup 2023) पाकिस्ताननं (Pakistan) आपल्या पराभवाचं सत्र कायम ठेवलं आहे. चेन्नईच्या (Chennai) एमए चिदंबरम स्टेडियमवर (M. A. Chidambaram Stadium) शुक्रवारी (27 ऑक्टोबर) झालेल्या एका रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं (South Africa) पाकिस्तानचा एका विकेटनं पराभव केला. क्रिकेट विश्वचषकात (World Cup 2023) पाकिस्ताननं आधीच सलग चार सामने गमावलेले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेकडून करण्यात आलेल्या पराभवामुळे बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वात पाकिस्तान संघाचं सेमीफायनल गाठणंही कठीण आहे. 

दक्षिण आफ्रिकेच्या पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयानंतर केशव महाराज (Keshav Maharaj) सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला आहे. केशवनंच 48व्या षटकात मोहम्मद नवाजच्या दुसऱ्या चेंडूवर विजयी चौकार ठोकला आणि संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या 260 धावांवर 9 विकेट पडल्या होत्या आणि विजयासाठी अजून 11 धावांची गरज होती. अशा बिकट परिस्थितीत महाराजनमं तबरेझ शम्सीच्या साथीनं 11 धावांची मौल्यवान भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. केशवनं 21 चेंडूत सात नाबाद धावा केल्या, तर तबरेझनं 6 चेंडूत चार नाबाद धावा केल्या. विजयी चौकार मारल्यानंतर केशव महाराजचा उत्साह पाहण्यासारखा होता.

सध्या सोशल मीडियावर दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची जोरदार चर्चा आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, केशवचं भारतासोबत एक खास कनेक्शन आहे. केशव महाराज भारतीय वंशाचा आहे. केशवचे पूर्वज भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील सुलतानपूरचे होते. केशवचे वडील आत्मानंद महाराज यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं की, त्यांचे पूर्वज 1874 च्या सुमारास सुलतानपूरहून डर्बनला आले होते. त्या काळात भारतीय लोक कामाच्या शोधात दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांत स्थलांतरीत होत होते. केशव हिंदू देवी-देवतांची पुजाही करतो, विशेषत: तो हनुमानाचा मोठा भक्त आहे. 

केशवचे वडीलही क्रिकेटपटू 

केशवचे वडील आत्मानंद हे देखील क्रिकेटपटू होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी विकेटकिपरची भूमिका पार पाडली आहे. मात्र, आत्मानंद यांना कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. केशव महाराजच्या कुटुंबात एकूण 4 सदस्य आहेत. केशव व्यतिरिक्त आई-वडील आणि एक बहीण आहे. बहिणीचं लग्न श्रीलंकेत झालं आहे. केशवचे वडील आत्मानंद यांनी सांगितलं होतं की, आम्ही आमच्या कुटुंबातील पाचवी किंवा सहावी पिढी आहोत. 'महाराज' हे आडनाव माझ्या पूर्वजांची देण आहे. भारतात नावाचं महत्त्व काय आहे, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे.

33 वर्षीय केशव महाराज यांनी आतापर्यंत 49 कसोटी, 37 एकदिवसीय आणि 26 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या कालावधीत केशव महाराजनं कसोटी सामन्यात 31.99 च्या सरासरीनं 158 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर या फिरकीपटूच्या नावावर एकदिवसीय सामन्यात 44 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 22 विकेट आहेत. बॅटनं आपला पराक्रम दाखवत महाराजनं कसोटी क्रिकेटमध्ये 1129 धावा आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 209 धावा केल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा खरा तारणहार एडन मार्करम

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाच्या विजयात एडन मार्करमनंही महत्त्वाची भूमिका बजावली होती. मार्करमनं 93 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 91 धावा केल्या. मार्करमनं सर्वात आधी रॅसी व्हॅन डर डुसेनसह तिसऱ्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली. त्यानंतर त्याने डेव्हिड मिलरच्या साथीनं पाचव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. तर, गोलंदाजीत चार विकेट घेणारा तबरेझ शम्सी सामनावीर ठरला.

टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर, पॉईंट टेबलमध्ये दक्षिण आफ्रिका अव्वल 

1999 नंतर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिका विश्वचषक सामन्यात (T20/ODI) पाकिस्तानचा पराभव केला आहे. सध्याच्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा सहा सामन्यांतील हा पाचवा विजय ठरला. या विजयासह ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचले आहेत. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी 10 गुण आहेत, परंतु चांगल्या नेट-रन रेटमुळे आफ्रिका अव्वल स्थानावर आली आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेनं भारतापेक्षा एक सामना अधिक खेळला आहे. टीम इंडिया आता दुसऱ्या स्थानावर तर न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर आहे. 

वर्ल्डकप 2023 मध्ये केवळ एका रनमुळं विजय 

  • वेस्ट इंडीज विरुद्ध पाकिस्तान, बर्मिंघम 1975 
  • पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज, लाहौर 1987 
  • दक्षिण अफ्रीका विरुद्ध श्रीलंका, प्रोविडंस 2007 
  • इंग्लंड विरुद्ध वेस्टइंडीज, ब्रिजटाउन 2007 
  • अफगानिस्तान विरुद्ध स्कॉटलँड, डुनेडिन 2015 
  • न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ऑकलँड 2015 
  • दक्षिण अफ्रीका विरुद्ध पाकिस्तान, चेन्नई 2023

महत्त्वाच्या इतर बातम्या :

VIDEO : जेव्हा हमसून हमसून रडलो होतो, तेव्हाचं निवृत्त झालो होतो, धोनीने 3 वर्षानंतर गुपित सांगितलं!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacked Criminal CCTV : सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा आराेपी सीसीटीव्हीत कैदTop 50 : टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर Abp MajhaSaif Ali Khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो समोरABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 16 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Dhananjay Munde : वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
Kolhapur News : चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
Pune Accident: पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
Embed widget