(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs WI : विंडिजचा फलंदाजीचा निर्णय, स्मृती मंधानाचं पुनरागमन, कशी आहे दोन्ही संघाची प्लेईंग 11
Women T20 WC 2023 : वेस्ट इंडिजची कर्णधार हेले मॅथ्यूज हिने नाणेफेकीचा कौल जिंकला असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
India vs West Indies, Women T20 WC 2023 : भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करत विश्वचषकाची सुरुवात दणक्यात केली. पण आता टीम इंडियापुढे वेस्ट इंडिजचं तगडे आव्हान असेल. दक्षिण आऐफ्रिकामधील केपटाऊनच्या न्यूलँड्सच्या मैदानावर सामना होत आहे. वेस्ट इंडिजची कर्णधार हेले मॅथ्यूज हिने नाणेफेकीचा कौल जिंकला असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुखापतीमुळे पहिल्या सामन्याला मुकणाऱ्या स्मृती मंधानाला भारताच्या प्लेईंग 11 मध्ये सामील करण्यात आले आहे.
पाकिस्तानला पराभव केल्यामुळे भारतीय संघाचं मनोबल वाढलं असेल तर दुसरीकडे पहिल्या विजयासाठी विडिंजचा संघ मैदानात उतरणार आहे. विडिंजला पहिल्या सामन्यात इंग्लंडकडून पराभवाचा सामना कारावा लागला होता.
🚨 A look at #TeamIndia's Playing XI for the game against West Indies 🔽
— BCCI Women (@BCCIWomen) February 15, 2023
Follow the match ▶️ https://t.co/rm4GUZIzSX #T20WorldCup | #INDvWI pic.twitter.com/dQjfUTruju
कशी आहे टीम इंडियाची प्लेईंग 11 -
स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, देविका वैद्य, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंह
वेस्ट इंडिज संघाची प्लेईंग 11 -
हेले मॅथ्यूज (कर्णधार), स्टॅफनी टेलर, शेमेन कँपबेल, शबिका गजनबी, चिनले हेनरी, चेडियन नेशन, अफी फ्लेचर, शामिलिया कॉनेल, रशादा विलियम्स (विकेटकीपर), करिश्मा रामहरैक, शकीरा सेलमैन
ICC Women's T20 WC 2023. WEST INDIES XI: H Matthews (c), S Taylor, S Campbelle, S Gajnabi, C Henry, C Nation, A Fletcher, K Ramharack, S Connell, R Williams (wk), S Selman. https://t.co/rm4GUZIzSX #INDvWI #T20WorldCup
— BCCI Women (@BCCIWomen) February 15, 2023
टी 20 विश्वचषकात भारताने विजयाने सुरुवात केली पण वेस्ट इंडिज संघाला मात्र पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. विडिंजचा संघ इंग्लंड संघाकडून सात विकेट्सनं पराभव झाला होता. विश्वचषकातील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी वेस्ट इंडिजच्या संघाला भारताविरोधात विजय अनिवार्य आहे. आजच्या सामन्यात पराभव झाल्यास विडिंजचं उपांत्य फेरीतील आव्हान आणखी कठीण होणार आहे. भारतीय संघानं विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या काही षटकात धावा दिल्या. भारतीय संघाला विजयासाठी गोलंदाजीत आणखी चांगली कामगिरी करावी लागणार आहे. गोलंदाजी सुधारली नाही तर भारताच्या अडचणी वाढू शकतात. फलंदाजीत जेमिमा रोड्रिग्स आणि ऋचा घोष यांनी दमदार फलंदाजी केली आहे. त्यामुळे मध्यक्रम मजबूत दिसत आहे. त्याशिीवाय या सामन्यात सलामी फलंदाज स्मृती मंधाना परतण्याची शक्यता आहे.