IND vs PAK : पुन्हा एकदा मौका-मौका! टी20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान आमने-सामने, सामन्याबद्दलची सारी माहिती एका क्लिकवर
T20 World Cup 2022: भारत आणि पाकिस्तान यांच्यात उद्या अर्थात 23 ऑक्टोबर रोजी सामना रंगणार असून या सामन्यासाठी दोन्ही देशांसह सर्वच क्रिकेटरसिक कमालीचे उत्सुक आहेत.
IND vs PAK Match Preview : जागतिक क्रिकेटमधील कट्टर प्रतिस्पर्धी असणारे भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) उद्या अर्थात 23 ऑक्टोबर रोजी एकमेंकाशी भिडणार आहेत. दोन्ही संघाचा टी20 विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेतील हा पहिला सामना असेल. या सामन्यापूर्वी दोन्ही देशातील प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला गेलीय. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीत कोणता संघ बाजी मारेल? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. नुकत्याच झालेल्या आशिया चषकातील दोन सामन्यांपैकी एकामध्ये भारताने बाजी मारली तर एकामध्ये पाकिस्तान जिंकला, त्यानंतर आता पुन्हा दोघे आमने-सामने येत असून या सामन्यापूर्वी सामन्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊ...
भारत विरुद्ध पाकिस्तान Head to Head
टी20 क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ यांच्यात आतापर्यंत 11 टी-20 सामने खेळवले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारताचं पारडं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने 11 पैकी 8 सामन्यात विजय मिळवलाय. तर, पाकिस्तान संघाला 3 सामने जिंकता आले आहेत.
पाऊस येणार?
मेलबर्नमध्ये आज म्हणजेच शनिवारी सकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला आणि आकाश ढगाळ झाले होते, त्यामुळे रविवारी भारत-पाकिस्तान सामन्यावेळीही मुसळधार पाऊस पडेल, असं वाटत होतं. पण मेलबर्नच्या हवामानात अचानक बदल झाला आणि पाऊस थांबून ऊनही पडलं आहे. दरम्यान Weather.com ने आधी दिलेल्या माहितीनुसार मेलबर्नमध्ये 23 ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यता 80 टक्क्यांहून अधिक होती. पण आता हवामानात बदल झाल्यानंतर तेथे पावसाची 25 टक्के शक्यताच असल्याने सामना वेळेत आणि संपूर्ण ओव्हर्सचा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कसे असू शकतात दोन्ही संघ?
भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.
पाकिस्तान: बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शान मसूद, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हॅरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.
कधी, कुठं रंगणार सामना?
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील हा सामना रविवारी 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामना सुरू होईल. तर, या सामन्याच्या अर्धातास पूर्वी नाणेफेक होईल. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्याीतील लाईव्ह सामना डीडी स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्सवर पाहता येणार आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार पाहता येणार आहे. याशिवाय आशिया चषकाच्या संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी https://marathi.abplive.com वर भेट देऊ शकतात.
हे देखील वाचा -