Arshdeep Singh: अर्शदीपला मोठ्या विक्रमाची संधी; आरपी सिंहचा रेकॉर्ड मोडण्यापासून चार विकेट्स दूर
T20 World Cup 2022: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे.
T20 World Cup 2022: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकात अर्शदीप सिंहनं चमकदार गोलंदाजी केली आहे. या स्पर्धेत त्यानं आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यात 9 विकेटस् घेतल्या आहेत. दरम्यान, रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ रविवारी सुपर 12 फेरीतील त्यांचा अखेरचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध (IND vs ZIM) खेळणार आहे. या सामन्यात अर्शदीपकडं भारताचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंहचा (RP Singh) विक्रम मोडण्यासाठी संधी आहे.
आरपी सिंहचा विक्रम मोडण्यासाठी मैदानात उतरणार
दरम्यान, टी-20 विश्वचषकाच्या एका स्पर्धेत भारताकडून आरपी सिंहनं सर्वाधिक विकेट्स घेतल्या. 2007 च्या टी-20 विश्वचषकात आरपी सिंहनं 12 विकेट्स घेतले. त्यानंतर या यादीत इरफान पठाण आणि आशीष नेहरा संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. इरफाननं 2007 च्या टी-20 विश्वचषकात 10 विकेट्स घेतल्या होते. तर, आशीष नेहरानं 2010 च्या टी-20 विश्वचषकात 10 विकेट्स घेतल्या आहेत. याबाबतीत अर्शदीप सिंह लक्ष्मीपति बालाजी याच्यासह प्रत्येकी 9-9 विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.अर्शदीपनं आणखी चार विकेट्स घेतल्यास तो टी-20 विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरलाय.
अर्शदीपची टी-20 विश्वचषकातील कामगिरी
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकात भारतानं आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. यापैकी तीन सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. भारतानं त्यांचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी खेळणार आहे. या सामन्यात अर्शदीप सिंहनं चार षटकात 32 धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. नेदरलँड्सविरुद्ध सामन्यातही त्यानं दोन विकेट्स मिळवल्या. त्यानंतर अर्शदीपनं दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध सामन्यात प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. भारताला दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.
अर्शदीप सिंहची टी-20 कारकिर्द
विशेष म्हणजे, अर्शदीप सिंह युवा खेळाडू असला तरी त्यानं आपल्या कामगिरीच्या जोरावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अर्शदीपनं आतापर्यंत खेळलेल्या 17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 28 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटच्या 10 डावात 21 विकेट्स घेतल्या आहेत. अर्शदीपनं इंडियन प्रीमियर लीगमध्येही चांगली गोलंदाजी केली होती. ज्यामुळं त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली.
हे देखील वाचा-