AUS vs AFG: 6 चेंडूत 22 धावांची गरज असताना राशीदची एकाकी झुंज; अवघ्या चार धावांनी गमावला सामना
T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील आपल्या अखेरच्या आणि महत्वपूर्ण सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं चार धावांनी अफगाणिस्तानचा धुव्वा उडवला.
T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील आपल्या अखेरच्या आणि महत्वपूर्ण सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं चार धावांनी अफगाणिस्तानचा धुव्वा उडवला. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघानं अफगाणिस्तानसमोर 169 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघानं 164 धावा केल्या. अखेरच्या षटकात अफगाणिस्तानच्या संघाला 22 धावांची गरज असताना स्टार ऑलराऊंडर राशीद खाननं (Rashid Khan) एकाकी झुंज देत ऑस्ट्रेलियाची धाकधूक वाढवली. मात्र, संघाला विजय मिळवून देण्यास तो अपयशी ठरला.
दरम्यान, अफगाणिस्तानच्या संघाला अखेरच्या षटकात 22 धावांची गरज असताना कर्णधार मॅथ्यू वेडनं चेंडू मार्कस स्टॉयनिसकडं चेंडू सोपवला. या षटकातील पहिला चेंडू राशीदनं निर्धाव खेळला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकून अफगाणिस्तानच्या अपेक्षा जिवंत ठेवल्या. मात्र, तिसरा चेंडू निर्धाव टाकत स्टॉयनिसनं कमबॅक केलं. चौथ्या चेंडूवर षटकार मारत राशीदनंही आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर पाचव्या चेंडूवर राशीदनं उत्तुंग फटका मारला. मात्र, हा चेंडू मैदानातच पडला. या चेंडूवर राशीदनं दोन धावा काढल्या. यानंतर सामना पूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं झुकला फक्त औपचारिकता म्हणून अखेरचा चेंडू टाकण्यात आला. या चेंडूवर राशीदनं चौकार मारला.
ऑस्ट्रेलिया- अफगाणिस्तान यांच्यातील अखेरचं षटक
19.1: दर्विश रसूली बाद
19.2: राशीनं चौकार मारला
19.3: निर्धाव चेंडू
19.4: राशीदचा षटकार
19.5: राशीदनं दोन धावा घेतल्या
19.6: राशीदचा चौकार
इंग्लंड- अफगाणिस्तान सामन्यावर सर्वांचं लक्ष
ऑस्ट्रेलियाच्या संघानं अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवला असला तरी सेमीफायनचं तिकीट मिळवण्यासाठी त्यांना इंग्लंड- श्रीलंका यांच्यातील सामन्यावर अवलंबून राहवं लागणार आहे. श्रीलंकेच्या संघानं इंग्लंडचा पराभव केल्यास ऑस्ट्रेलियाचं सेमीफायनलमधील स्थान पक्क होईल.
सुपर-12 ग्रुप 1 ची गुणतालिका-
क्रमांक | संघ | सामने | विजय | पराभव | अनिर्णित | गुण | नेट रनरेट |
1 | न्यूझीलंड | 5 | 3 | 1 | 1 | 7 | +2.113 |
2 | ऑस्ट्रेलिया | 5 | 3 | 1 | 1 | 7 | -0.173 |
3 | इंग्लंड | 4 | 2 | 1 | 1 | 5 | +0.547 |
4 | श्रीलंका | 4 | 2 | 2 | 0 | 4 | -0.457 |
5 | आयर्लंड | 5 | 1 | 3 | 1 | 2 | -1.165 |
6 | अफगाणिस्तान | 5 | 0 | 2 | 2 | 2 | -0.718 |
हे देखील वाचा-