Gautam Gambhir: द.आफ्रिकेविरुद्ध 'या' खेळाडूला संघात स्थान मिळताच गंभीर चांगलाच भडकला, म्हणाला...
T20 World Cup 2022: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार रोहित शर्मानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात भारतानं आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केला.
T20 World Cup 2022: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार रोहित शर्मानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात भारतानं आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केला. या सामन्यात अक्षर पटेलला विश्रांती देऊन त्याच्या जागी दीपक हुडाचा संघात समावेश करण्यात आला. भारताच्या प्लेईंग इलेव्हनमधील बदल पाहून माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं (Gautam Gambhir) नाराजी व्यक्त केली. गंभीरनं भारताच्या प्लेईंग इलेव्हनबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गंभीर म्हणाला, "हा माझ्यासाठी आश्चर्यचकीत करणारा निर्णय होता. संघात आणखी एका फलंदाजाचा समावेश करण्याची काय आवश्यकता होती. मला माहिती आहे, अक्षर पटलेनं जास्त गोलंदाजी केली नाही. परंतु, मागच्या सामन्यात त्यानं चार षटक गोलंदाजी केली होती. भारतीय संघ अवघ्या पाच गोलंदाजांसह खेळत आहे. या सामन्यात दीपक हुडाचा संघात समावेश करण्यात आलाय. म्हणजेच भारतीय संघात आता सहा गोलंदाज असतील. दक्षिण आफ्रिकेच्या संघात काही डाव्या हाताचे फलंदाज आहेत, हे त्यामागचं कारण असू शकतं, असं माझं मत आहे."
पुढं गंभीर म्हणाला की, "या सामन्यात दीपक हुडाला कितव्या क्रमांकावर खेळवणार? काय त्याला सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी पाठवणार? तो असा फलंदाज नाही, जो सातव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. भारताच्या संघात सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणारा तो नाही. तुमच्या फलंदाजीत सखोलता आहे हे चांगले आहे, त्यात चुकीचे काही नाही पण ते तुम्हाला कोण मिळत आहे? यावर अवलंबून आहे. जर फलंदाज परिस्थितीला अनुकूल असेल तर ते देखील महत्त्वाचे आहे आणि आम्हाला प्रतीक्षा करावी लागेल आणि कमी मजबूत गोलंदाजी लाइनअपसह भारत कशी कामगिरी करेल हे पाहावे लागेल"
भारताची प्लेईंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, दीपक हुडा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह.
दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग इलेव्हन:
क्विंटन डी कॉक (विकेटकिपर) टेम्बा बावुमा (कर्णधार), रिली रोसो, एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया, लुंगी एनगिडी.
हे देखील वाचा-
- Watch : भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यापूर्वी हरभजनच्या चेंडूवर कतरिनाने ठोकला जोरदार शॉट, पाहा VIDEO