(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Watch : भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यापूर्वी हरभजनच्या चेंडूवर कतरिनाने ठोकला जोरदार शॉट, पाहा VIDEO
Katrina Kaif: भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्यापूर्वी टीम इंडियाला चीअर करण्यासाठी कतरिना कैफ स्टुडिओमध्ये पोहोचली होती. त्यावेळी माजी क्रिकेटर हरभजन आणि तिच्यात स्टुडिओमध्येच क्रिकेटचा डाव रंगला.
Katrina Kaif Batting Against Harbhajan Singh: टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cp 2022) भारताचा तिसरा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु आहे. भारताची फलंदाजी खास झाली नसून सूर्यकुमार सोडता इतर फलंदाजांना खास कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान या सामन्यापूर्वी मात्र स्टुडिओमध्ये भारतीय फॅन्सचं मनोरंजन करताना टीव्ही अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि माजी क्रिकेटर हरभजन सिंह (Harbhajan Singh) दिसून आला.
वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) सामन्यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ टीम इंडियाला चिअर करण्यासाठी स्टार स्पोर्ट्सच्या स्टुडिओमध्ये पोहोचली. कतरिना कैफचा 'फोनभूत' हा चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यापूर्वी स्टार स्पोर्ट्सच्या स्टुडिओमध्ये फोनभूत आणि टीम इंडियाला चिअर करण्यासाठी आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचलेली कतरिना कैफही यावेळी फलंदाजी करताना दिसली.तिने भारताचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंगच्या गोलंदाजीविरुद्ध फलंदाजी केली. व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, हरभजन कतरिनाविरुद्ध गोलंदाजी करत आहे. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये कतरिना कैफने हरभजन सिंगच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी देखील केली. भज्जीच्या चेंडूवर तिने शानदार चौकार आणि षटकार ठोकले. कतरिनाचा हा धमाकेदार फलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कॅटरिनाची फलंदाजी पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.
पाहा VIDEO
Katrina Kaif in the Star Sports studio. pic.twitter.com/E2ZaU5h4lP
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 30, 2022
एका बदलासह टीम इंडिया मैदानात
भारतानं विश्चचषक स्पर्धा सुरु झाल्यापासून दोन्ही सामने जिंकले आहेत. आधी पाकिस्तानला 4 विकेट्सनी मात दिल्यानंतर नेदरलँडविरुद्धचा सामनाही भारताने 56 धावांनी जिंकला. ज्यानंतर देखील भारतानं आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक बदल संघा केला आहे. त्यांनी अष्टपैलू अक्षर पटेलला (Axar Patel) विश्रांती देत दीपक हुडाला (Deepak Hooda) संघात संधी दिली आहे. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत संघात नसल्यानं त्याला संधी मिळेल असे वाटत होते. पण आज मात्र दीपक हुडाला संधी देत टीम इंडियानं काहीसा वेगला निर्णय घेतला आहे.
हे देखील वाचा-