India vs England, Playing 11 : सेमीफायनलच्या लढतीला काहीच वेळात सुरुवात, टीम इंडियात कोणताच बदल नाही, तर इंग्लंड दोन बदलांसह मैदानात
भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) सामन्याला सुरुवात होत असून नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आहे. इंग्लंडनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
IND vs ENG, Playing 11 : टी20 विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमीफायनलला ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड ओव्हल मैदानात सुरुवात होत आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) हा सेमीफायनलच्या सामन्यातनुकतीच नाणेफेक पार पडली आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकत बोलिंग निवडली आहे. दरम्यान दोन्ही संघाच्या प्लेईंग 11 चा विचार करता भारत झिम्बाब्वेविरुद्ध जो संघ मैदानात घेऊन उतरला होता, त्याच संघासोबत मैदानात उतरत आहे. तर इंग्लंड संघाने मात्र दोन बदल केले आहेत. दुखापतीमुळे इंग्लंडचा महत्त्वाचा गोलंदाज मार्क वुड आणि फलंदाज डेविड मलान संघाबाहेर गेले आहेत. त्यांच्या जागी ऑलराऊंडर ख्रिस जॉर्डन आणि फलंदाज फिलिप सॉल्ट यांना संघात संधी दिली गेली आहे.
कशी आहे दोन्ही संघाची अंतिम 11?
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.
इंग्लंडचा संघ
अॅलेक्स हेल्स, जोस बटलर(कर्णधार), बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, फिल सॉल्ट, ख्रिस जॉर्डन, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद
🚨 Toss & Team News from Adelaide 🚨
— BCCI (@BCCI) November 10, 2022
England have elected to bowl against #TeamIndia in the #T20WorldCup semi-final. #INDvENG
Follow the match ▶️ https://t.co/5t1NQ2iUeJ
Here's our Playing XI 🔽 pic.twitter.com/9aFu6omDko
भारत विरुद्ध इंग्लंड Head to Head?
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट सामन्यांमध्ये भारत आणि इंग्लंड संघ (IND vs ENG) यांच्यात आतापर्यंत 22 टी-20 सामने खेळवले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारताचं पारडं काहीसं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने 22 पैकी 12 सामन्यात विजय मिळवलाय. तर, इंग्लंड संघाला 10 सामने जिंकता आले आहेत.
कुठे पाहाल सामना?
या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील. तसंच डीडी स्पोर्ट्सवरही सामन्याचं थेट प्रक्षेपण होईल.
हे देखील वाचा-