IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया पुण्यात दाखल, कोहलीसह इतर खेळाडूंना पाहण्यासाठी विमानतळावर गर्दी
World Cup 2023 : विश्वचषकातील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ पुण्यात दाखल झाला आहे. 19 ऑक्टोबरला हा सामना रंगणार आहे.
India vs Bangladesh, World Cup 2023 : विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये टीम इंडियाचा (Team India) आगामी सामना बांगलादेश (IND vs BAN) विरुद्ध रंगणार आहे. या सामन्याधी टीम इंडिया पुण्यात पोहोचली आहे. विराट कोहली, रोहित शर्मासह इतर खेळाडूंना पाहण्यासाठी विमानतळावर मोठी गर्दी झाली होती. वर्ल्ड कपमध्ये भारताचा आगामी सामना 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेश विरोधात रंगणार आहे. हा सामना पुणे येथे पार पडणार आहे.
टीम इंडिया पुण्यात दाखल
विश्वचषक 2023 मध्ये आतापर्यंत टीम इंडियाची विजयी वाटचाल पाहायला मिळाली आहे. भारताने विश्वचषकात आतापर्यंत तीन सामने खेळले असून तिन्हीमध्ये विजय मिळवला आहे. भारताचा शेवटचा सामना पाकिस्तानविरुद्ध झाला. हा सामना अहमदाबादमध्ये खेळवण्यात आला. आता पुढचा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम (Maharashtra Cricket Association Stadium) वर दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी 1.30 वाजता नाणेफेक होईल.
#WATCH | Maharashtra: ICC World Cup: Team India arrived at Pune for their next match with Bangladesh, earlier today.
— ANI (@ANI) October 15, 2023
India will play against Bangladesh on October 19. https://t.co/NeU9ZLtM54 pic.twitter.com/3ILBk0fnnH
कुणाचं पारडं जड?
भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 40 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताचं वर्चस्व पाहायला मिळालं आहे. टीम इंडियाने 31 सामने जिंकले आहेत, तर 8 बांगलादेशने विजय मिळवला आहे. त्यामुळे टीम इंडिया विरोधातील आगामी सामना जिंकणं बांगलादेशसाठी सोपं नसेल. बांगलादेशला कडव्या स्पर्धेला सामोरं जावं लागणार. भारत आणि बांगलादेश यांच्यात यावर्षी फक्त एकच एकदिवसीय सामना खेळला गेला आहे. आशिया कप 2023 मध्ये हा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात टीम इंडियाला 6 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. बांगलादेशने पहिल्यांदा फलंदाजी करताना 265 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात 259 धावांवर भारतीय संघाचा डाव आटोपला.
Captain Rohit Sharma and King Virat Kohli in one frame at the airport in Pune.
— CricWatcher (@CricWatcher11) October 15, 2023
Team India will face Bangladesh on 19th October at Pune 💪#ViratKohli | #RohitSharma | #CWC23 pic.twitter.com/uRpY5kOxad
Team India has reached Pune for next match against Bangladesh🇧🇩 #INDvsPAK #IndiavsPak
— ICT Fan (@Delphy06) October 15, 2023
pic.twitter.com/5s7sqAAkNq
विश्वचषकासाठी भारत-बांगलादेश क्रिकेट संघ
भारतीय क्रिकेट संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव.
बांग्लादेश क्रिकेट संघ
लिटन दास, तनजीद हसन, नजमुल हुसेन शांतो, मेहिदी हसन मिराज, शकीब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), तौहीद हृदोय, महमुदुल्लाह, तस्किन अहमद, शॉरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, तनजीम हसन, शाकिब, शाकब नसूम अहमद, महेदी हसन.